ETV Bharat / state

पत्नीच्या प्रियकऱ्याची दगड घालून हत्या, पत्नीही थोडक्यात बचावली

author img

By

Published : Aug 13, 2020, 10:57 PM IST

वर्ध्यात पत्नीच्या प्रियकराचा खून
वर्ध्यात पत्नीच्या प्रियकराचा खून

वर्ध्याच्या शांतीनगर भागात यवतमाळ जिल्ह्यातील पळून आलेल्या प्रियकराची दगड घालून हत्या करण्यात आली. यावेळी प्रियकरासोबत असलेली पत्नीलाही मारण्याच्या प्रयत्नात असताना थोडक्यात बचावली.

वर्धा - वर्ध्याच्या शांतीनगर भागात यवतमाळ जिल्ह्यातील पळून आलेल्या प्रियकराची दगड घालून हत्या करण्यात आली. यावेळी प्रियकरासोबत असलेली पत्नीलाही मारण्याच्या प्रयत्नात असताना थोडक्यात बचावली. नागठाणा चौकात शेखर मोटर्स जवळ असलेल्या बुधवारच्या रात्री धाब्यासमोर ही घटना घडली. कैलास ढुमने (वय 30) हा मृत प्रियकराचे नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील मोहा येथील रहिवासी आहे. तर विलास उर्फ बाल्या कासार (वय 40) असे फरार असलेल्या मारेकरी पतीचे नाव आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील वीट भट्टीवर विलास कासार त्याच्या पत्नी आणि लहान मुलीसोबत राहत होता. काही महिन्यांपूर्वी कैलास ढुमने हा तिथे वीट भट्टीवार कामाला आला. याच दरम्यान त्याचे विलासच्या पत्नीसोबत संबंध जुळले. यामुळे 10 दिवसापूर्वीच पती पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर पत्नी प्रेमी कैलास सोबत लहान मुलीसह पळून गेली. तेव्हापासून विलास त्यांच्या शोधात होता. त्याला प्रियकर विलास आणि पत्नी हे वर्ध्याच्या शांतीनगर येथील नातलगाकडे असल्याची माहिती मिळाली.

विलास कासार हा पत्नी आणि त्याच्या प्रियकरासोबत असलेल्या ठिकाणी पोहचला. तिथे त्याने पत्नीशी बोलणे केले. परत चल असे त्याने सांगितले. यानंतर ते चौघेही पुढे हिंगणघाट तालुक्यातील धोत्रा येथे जायला निघाले. पाऊस सुरू असल्याने नागठाणा परिसरात पुढे प्रवास न करता ते थांबले. यावेळी धाबा चालक डेहनकर यांनी त्यांना जेवण दिले. जोरात पाऊस सुरू असल्यामुळे त्यांना शेजारी असलेल्या दुकानाच्या शेडमध्ये थांबण्यास सांगितले.

सर्वजण झोपलेले असताना अचानक रात्री विलासने प्रियकर कैलासची दगड टाकून हत्या केली. यानंतर त्याने पत्नीची पत्नीचा गळा दाबून हत्या करण्याच्या प्रयत्नात केला. तेव्हा आरडाओरड्याचा आवाज ऐकून चौकीदार धावून आला. यावेळी विलास कासारने मात्र पळ काढला. त्यामुळे पत्नी थोडक्यात वाचली.

या घटनेची माहिती रामनगर पोलिसाना देण्यात आली. पोलीस निरीक्षक धनाजी जळक घटनास्थळी पोहचले. यावेळी कैलास ढुमने याला दवाखान्यात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उपविभागीय पोलीस अधिकारी पियुश जगताप यांनी चमूसोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विलास कासार याचा शोध सुरु करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.