ETV Bharat / state

Religious Conversion: मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरण; उत्तर प्रदेश गाझियाबाद पोलिस पोहोचले मुंब्रा पोलीस ठाण्यात

author img

By

Published : Jun 8, 2023, 10:04 AM IST

Religious Conversion
मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर

मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरणात शेकडो धर्मांतर झाली असल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांना संशय आहे. याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश गाझियाबाद पोलिस मुंब्रा पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर

ठाणे : ऑनलाईन धर्मांतराचा विषय गाजत असताना आता त्यांची लिंक मुंब्रा येथून लागली आहे. शहनवाज नावाच्या एका तरुणाने फेक युजर आयडीच्या सहाय्याने अकाऊंट तयार केले. त्यावरून गेम बनवून गेमच्या मदतीने हिंदू युवा पिढीला धर्मांतर करण्यासाठी आग्रह करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. या शाहनवाजचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद पोलीस थेट मुंब्रा येथील देवरीपाडा परिसरात येऊन पोहचले. त्यानंतर या गोष्टीचा खुलासा झाला.

शाहनवाजची शोध मोहीम सुरू : सध्या गाझियाबाद पोलीस हे मुंब्रा पोलिसांसोबत शाहनवाजचा शोध घेत आहेत. सध्या शाहनवाज हा आपल्या परिवारासह फरार आहे. मात्र गेल्या 4 दिवसापासून गाझियाबाद पोलिसांची मुंब्रा पोलिसांसोबत शाहनवाजची शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश-गाझियाबादचे पोलिस उपनिरीक्षक सहदेव सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही 03 मे रोजी मुंबईत पोहोचलो आहोत. काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे निवेदन दिले आहे.

पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू : या प्रकरणाशी संबंधित तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले की, गाझियाबाद पोलीस या प्रकरणाच्या शोधात येथे आले आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात यश आलेले नाही, प्रयत्न सुरू आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, कोणतीही गोष्ट अगोदरच कशी सांगता येईल. मुंब्य्रातील 400 जणांचे धर्मांतर झाल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी येथे आलो आहोत, पुरावे गोळा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. conversion : पाचवेळा जिमला जायचा मुलगा, बापाने पाठलाग करताच समोर आला धर्मांतराचा सापळा
  2. Religious Conversion in Kanpur : धर्मांतर करणारी दक्षिण कोरियाची टोळी, छापा टाकून दोघांना अटक
  3. Police raid in badlapur : बिनदिक्कतपणे होत आहे धर्मांतर; पोलिसांनी केली कारवाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.