ETV Bharat / state

अंधश्रद्धेतून काकाची हत्या; पोलिसांकडून पुतण्यासह पाच जणांना अटक

author img

By

Published : Nov 20, 2019, 9:37 PM IST

अंधश्रद्धेतून काकाचा खून करणाऱ्या अमित नागरे याच्यासह 5 आरोपींना शिळ डायघर पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांवर काकाने करणी करुन मारल्याच्या अंधश्रद्धेतून आरोपी अमितने काकाची हत्या केली होती.

अंधश्रद्धेतून काकाची हत्या; पोलिसांकडून पुतण्यासह पाच जणांना अटक

ठाणे - अंधश्रद्धेतून काकाचा खून करणाऱ्या अमित नागरे याच्यासह 5 आरोपींना शिळ डायघर पोलिसांनी अटक केली आहे. पुतण्या अमित नागरे, निहाल हांडोरे, अविनाश वानखेडे, शुभम ढबाले, अमर शर्मा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. अमितने त्याच्या काकाचे शीर 10 किलोमीटर लांब असलेल्या दिवा क्षेपणभूमीत फेकले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अंधश्रद्धेतून काकाची हत्या; पोलिसांकडून पुतण्यासह पाच जणांना अटक

हेही वाचा - रायगडमध्ये तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल

शिळ डायघर येथील पिंपरी गाव परिसरात 15 नोव्हेंबरला एका डोंगराजवळ शीर नसलेले धड पोलिसांना सापडले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. हा मृतदेह कोणाचा याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. याच दरम्यान, विष्णु नागरे नावाचे व्यक्ती हरवल्याची तक्रार शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी विष्णु यांच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेह दाखविला. त्यावेळी विष्णू यांचाच हा मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी सांगितल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीस सुरुवात केली.

दरम्यान पोलिसांनी विष्णु यांचा पुतण्या अमित नागरे याची चौकशी सुरू केली असता, त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळत नव्हती. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याच्या इतर चार साथिदारांनाही अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली .

अमित याच्या वडिलांचा 2016 मध्ये आजारपणात मृत्यू झाला होता. मात्र, वडिलांवर मृत विष्णु नागरे यांनी करणी केल्याचा संशय अमितच्या मनात होता. एक दिवस विष्णु यांचा खून करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर त्याने याची माहिती त्याच्या इतर चार साथिदारांना दिली. या पाच जणांनी विष्णु यांना डोंगर पायथ्याजवळ मद्यपार्टी करण्यासाठी बोलावले. तिथे गेल्यावर त्यांच्यावर कोयता आणि तलवारीने वार करण्यात आले. त्यानंतर कोयत्याने अत्यंत निर्घुणपणे त्यांचे शिर धडावेगळे केले. यानंतर अमित आणि अविनाशने दुचाकीवरून हे शीर बॅगेत भरून 10 किलोमीटर लांब असलेल्या दिवा क्षेपणभूमीत फेकून दिले. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली.

हेही वाचा - अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या २ टिप्परवर कारवाई; वाहन मालकांना ठोठावला लाखोंचा दंड

Intro:अंध श्रद्धा ठरली हत्येचे कारण शीर धडापासून फेकलेल्या हत्येचा डायघर पोलिसांनी केला उलगडाBody:शिर धडावेगळे करून काकाचा खून करणाऱ्या अमित नागरे याच्यासह पाच जणांना शिळ डायघर पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे. पुतण्या अमित नागरे, निहाल हांडोरे, अविनाश वानखेडे, शुभम ढबाले, अमर शर्मा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली. अमितने त्याच्या शिर १० किलोमीटर लांब असलेल्या दिवा क्षेपणभूमीत फेकले असे पोलिसांनी सांगितले.
शिळ डायघर येथील पिंपरी गाव परिसरात १५ नोव्हेंबरला एका डोंगराजवळ शिर नसलेले धड पोलिसांना सापडले होते. त्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. हे धड कोणाचे आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. याच दरम्यान, विष्णु नागरे नावाचे व्यक्ति हरविल्याची तक्रार शिळ डायघर पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलिसांनी विष्णु यांच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेह दाखविला. त्यावेळी विष्णु यांचाच हा मृतदेह असल्याचे नातेवाईकांनी सांगितल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशीस सुरूवात केली. दरम्यान पोलिसांनी विष्णु यांचा पुतण्या अमित नागरे याची चौकशी सुरू केली असता, त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळत नव्हती. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून ताब्यात घेतल्यानंतर त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून त्याच्या इतर चार साथिदारांनाही अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली .
अमित याच्या वडिलांचा २०१६ मध्ये आजारपणात मृत्यू झाला होता. मात्र, वडिलांवर मयत विष्णु नागरे यांनी करणी केल्याचा संशय अमितच्या मनात होता. एक दिवस विष्णु यांचा खून करण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर त्याने याची माहिती त्याच्या इतर चार साथिदारांना दिली. या पाच जणांनी विष्णु यांना डोंगर पायथ्याजवळ मद्यपार्टी करण्यासाठी बोलावले. तिथे गेल्यावर त्यांच्यावर कोयता आणि तलवारीने वार करण्यात आले. त्यानंतर कोयत्याने अत्यंत निर्घुणपणे त्यांचे शिर धडावेगळे केले. यानंतर अमित आणि अविनाशने दुचाकीवरून हे शिर बॅगेत भरून १० किलोमीटर लांब असलेल्या दिवा क्षेपणभूमीत फेकून दिले. अशी माहिती पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी दिली .

BYTE : सुभाष बुरसे - पोलिस उपायुक्त ,ठाणे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.