ETV Bharat / state

Thane Crime News : ब्युटी पार्लरचा खर्च भागवण्यासाठी चोऱ्या; दोन सख्ख्या बहिणींना अटक

author img

By

Published : Aug 3, 2023, 9:33 PM IST

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील (Thane Crime News) सोनाराच्या दुकानातून दोन सख्ख्या बहिणींनी हातचालाखीने दागिने लंपास केले होते. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघींनाही अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, या दोन्ही बहिणी मौजमजेसह ब्युटी पार्लरचा खर्च भागविण्यासाठी चोऱ्या करीत असल्याचे तपासात समोर (Thane Robbery News) आले आहे.

Jeweler Theft Case Thane
दोन सख्ख्या बहिणींना अटक

चोरीतील आरोपी असलेल्या महिलांना अटक प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

ठाणे : निशा अशोक पुनवानी (वय ३५ वर्षे) आणि रेश्मा अशोक पुनवानी (वय ३६ वर्षे) असे अटक केलेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (Thane Crime News) विमल सुमेरमल शंखलेशा (वय ४९ वर्षे) यांच्या मालकीचे एम. एम. शंखलेशा ज्वेलर्स नावाने कल्याण पश्चिम भागातील नारायणवाडी परिसरात सोने, चांदी विक्रीचे दुकान आहे. या दुकानात १६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास (Thane Robbery News) दोन महिला अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्यावेळी दुकानातील कामगाराने त्यांना अंगठ्यांच्या बॉक्समधील अंगठी दाखविली. दुकानातील इतरही ग्राहकांना दागिने दाखविण्यात कामगार व्यस्त असल्याचे पाहून त्या दोन्ही महिलांनी हातचलाखीने अंगठ्या लंपास केल्या. यानंतर त्या दुकानातून निघून गेल्या.

अशी पटली आरोपींची ओळख : अंगठ्यांचे बॉक्स कपाटात ठेवत असताना त्यामधील अंगठ्या चोरीस गेल्याचे कामगारांच्या लक्षात आले. यानंतर दुकान मालक शंखलेशा यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या दोन अनोळखी महिलांवर संशय व्यक्त करत त्यांच्या विरोधात १६ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल असलेल्या अज्ञात महिला आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे तपासासाठी दिला होता. तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिला आरोपींची ओळख पटवली.

अखेर आरोपी महिलांना अटक : उल्हासनगर शहरातील पाच नंबर भागातील कुर्ला कॅम्प येथून निशा आणि रेश्मा या दोघींना १ ऑगस्ट रोजी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अटक महिला आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. शिवाय उल्हासनगरमधील एका सोनाराच्या दुकानात दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे. महिला आरोपींकडून ९ ग्रॅम वजनाच्या सोन्याची अंगठी जप्त केली. याची किंमत एकूण ५६ हजार असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सूचित ठिकेकर करीत आहेत. राज्यातील अनेक सोन्या-चांदीच्या दुकानात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत आहेत.

हेही वाचा:

  1. Businessman Online Game Cheating: ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक; बुकीच्या घरातून करोडोंचे घबाड जप्त
  2. Murder Case Nagpur: चहा प्यायला दुकानावर आला; मागावर असलेल्या गुंडांनी जागीच संपवला
  3. ATS Arrested Bangladeshi Nationals : एटीएस पथकाकडून सात बांगलादेशी नागरिकांना अटक; बलात्काराच्या वॉन्टेड आरोपीचाही समावेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.