ठाणे : पावसाळ्यात नदी ओलांडण्यासाठी आदिवासी तरुणांनी केला जीवघेणा प्रयत्न

author img

By

Published : Sep 14, 2021, 9:38 PM IST

Updated : Sep 14, 2021, 10:35 PM IST

tribal youth take risk to cross river thane shahapur

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा आदिवासी तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. याच शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेली दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील तलवाडा, शिशवली, मनाचा आंबा असे अनेक गाव- पाड्यातील तरुण पावसाळ्यात नदी नाल्यांसह ओढ्यामध्ये पूरसदृश्य स्थित निर्माण झालेली असते. अशात पावसाळ्यात गावातील तरुण बाजारात किंवा रोजीरोटीसाठी कामावर जाण्या-येण्यासाठी या नदीला ओलांडून पार करावे लागते.

ठाणे - येथील ठाणे ग्रामीण भागात आजही बहुतांश गाव-पाड्याकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यातच पावसाळ्यात नदी-नाल्यांसह ओढ्यांना महापुराचा वेढा पडतो. यामुळे कामासाठी बाहेर जायचे कसे व रुग्णांना रूग्णालयात घेऊन जावे कसे? असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. मात्र अशा पश्नांवर शहापूर तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या तरुण बांधवांनी एक वेगळी शक्कल लढवली. हा मार्ग जीवघेणा जरी असला तरीही पोटापाण्यासाठी जायचे कसे? यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग तरुणांनी निवडल्याचे सांगण्यात आले.

नदी ओलांडण्याचा प्रयत्न करताना तरुण

पावसाळ्यात रोजीरोटीसाठी जीवघेणा प्रवास -

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा आदिवासी तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. याच शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेली दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील तलवाडा, शिशवली, मनाचा आंबा असे अनेक गाव- पाड्यातील तरुण पावसाळ्यात नदी नाल्यांसह ओढ्यामध्ये पूरसदृश्य स्थित निर्माण झालेली असते. अशात पावसाळ्यात गावातील तरुण बाजारात किंवा रोजीरोटीसाठी कामावर जाण्या-येण्यासाठी या नदीला ओलांडून पार करावे लागते.

हेही वाचा - वर्धा नदीत बोट उलटली; तीन मृतदेह हाती लागले, 8 अद्यापही बेपत्ता

दोरखंडच्या सहय्याने प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल -

विशेष म्हणजे, रोजच जाणाऱ्या तरूणांनी एका दोरखंडच्या साहाय्याने नदीच्या दोन्ही बाजूला दोर बांधून झोलीसारखी बनवून त्यावर लोखंडी फिरकी लावण्यात आली. याच दोरखंडच्या साहाय्याने नदीच्या दुसऱ्या बाजूने ओढल्याने या काठावरचा तरुण त्या काठावर सहजपण जावू शकतो, अशी युक्ती या आदिवासी तरूणांनी शोधून काढली. हा जीवघेणा प्रवास असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ शहापूर तालुक्यात व्हायरल होत आहे.

Last Updated :Sep 14, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.