ETV Bharat / state

प्रेयसीला गाडीनं चिरडलं, प्रियकर अश्वजित गायकवाडसह तिघांना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 10:29 PM IST

Updated : Dec 17, 2023, 10:46 PM IST

Ashwajit Gaikwad
Ashwajit Gaikwad

Thane Runover Case : ठाण्यात प्रेयसीला गाडीनं चिरडल्या प्रकरणी आरोपी अश्वजित गायकवाडसह त्याच्या २ साथिदारांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेलं वाहनही जप्त केलं

ठाणे Thane Runover Case : ठाण्यात प्रेयसीला गाडीनं चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या एसआयटीनं मुख्य आरोपी अश्वजित गायकवाडला रविवारी रात्री अटक केली. पोलिसांनी त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांनाही अटक केली आहे. याशिवाय पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेलं वाहनही जप्त केलं आहे.

काय आहे प्रकरण : ठाणे पोलिसांनी आरोपी अश्वजित गायकवाड आणि इतर दोघांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३२३ (स्वैच्छिकपणे दुखापत करणे), २७९ (रॅश ड्रायव्हिंग), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) आणि कलम ३३ नुसार गुन्हा दाखल केला होता. पीडितेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ती तिच्या प्रियकराला भेटायला गेली होती. तेव्हा तो त्याच्या पत्नीसोबत सापडला. जेव्हा तिनं त्याला यावरून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपी आक्रमक झाला आणि नंतर त्यानं त्यांच्या एसयूव्ही कारनं तिच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपीसोबत माझे साडेचार वर्षांपासूनचे संबंध होते, असा दावाही पीडितेनं केला आहे.

पीडितेची न्यायाची अपील : ही घटना सोमवारी पहाटे ठाण्यातील एका हॉटेलजवळ घडली. या प्रकरणात डीसीपी झोन ५ अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये अश्वजित गायकवाड आणि इतरांना आरोपी बनवण्यात आलं होतं. झालेल्या प्रकारानंतर पीडितेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्यायाची मागणी केली. "माझा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर प्रचंड विश्वास आहे. मला फक्त न्याय हवा आहे," असं ती म्हणाली.

हे वाचलंत का :

  1. प्रेयसीला कारखाली चिरडल्याचं प्रकरण, पीडितेचा पोलिसांवरच आरोप; चौकशीसाठी एसआयटी स्थापन
  2. प्रेयसीला कारखाली चिरडलं; नवीन ट्विस्ट आला समोर, पोलिसांनी जप्त केलेल्या गाडीवरून 'पायलट' लोगोच गायब
Last Updated :Dec 17, 2023, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.