ETV Bharat / state

सत्ताधारी आमदारांकडूनच ठाण्यातील विकासकामांची पोलखोल, शंभूराज देसाई यांनी 'हे' दिले आदेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 10:06 AM IST

displeasure among the representatives of thane district shambhuraj desai ordered punitive action
ठाणे जिल्हाच्या लोकप्रतिनिधींनी केली विकासकामांची पोलखोल; शंभूराज देसाईंकडून दंडात्मक कारवाईचे आदेश

Shambhuraj Desai News : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची सोमवारी (8 जानेवारी) बैठक पार पडली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकासकामांबाबत पोलखोल केली.

पालकमंत्री शंभूराज देसाई पत्रकार परिषद

ठाणे Shambhuraj Desai News : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सोमवारी (8 जानेवारी) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील आमदारांनी रस्त्यांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्ह्यात रस्त्याची कामं अर्धवट असून अनेक ठिकाणी मोठ-मोठे अपघात होत आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या जिल्ह्यात रस्त्याच्या कामाबाबत आमदारच तक्रार करत असतील तर राज्यात काय परिस्थीत असेल? असा सवालही आमदारांनी यावेळी उपस्थित केला.


ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश : रस्त्यांची कामं पूर्ण व्हावीत या दृष्टीनं ठेकेदारांकडून किरकोळ काम सुरू असल्याची तक्रार आमदारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडं केली. यावर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. ज्या रस्त्याची कॉलिटी कंट्रोल तपासणी झाली नसेल त्या रस्त्यांची तपासणी करण्यात यावी. तसंच ज्या रस्त्याची लाईफ साधारण 5 ते 7 वर्ष आहे. पण ते रस्ते वर्षभरातच खराब झाले तर ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मंत्री तथा पालकमंत्री देसाई यांनी दिले.

कोणत्या आमदारांनी केली तक्रार : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सोमवारी नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जिल्ह्यातील आमदार, विविध विभागातील वरीष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार महेश चौगुले, रहीस खान, किसन कथोरे, बालाजी किणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड, प्रमोद (राजू) पाटील आणि गीता जैन या 9 आमदारांनी सुरू असलेल्या रस्ते कामांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा -

  1. सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंविरोधात अश्लिल पोस्ट; शिंदे गटाच्या तालुका प्रमुखास जामीन
  2. आता आमचा योग्य पद्धतीनं सुखाचा संसार सुरू झाला: शंभूराज देसाई असं का म्हणाले?
  3. Shambhuraj Desai on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ समाजात निर्माण करताहेत संभ्रम - शंभूराज देसाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.