ETV Bharat / state

29 वर्षीय तरुणाचं 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न; मुलगी चार महिन्याची गरोदर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 12:01 PM IST

Updated : Jan 5, 2024, 12:17 PM IST

Thane Child Marriage
Thane Child Marriage

Thane Child Marriage : ठाण्यात 29 वर्षीय तरुणानं 12 वर्षांच्या मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

ठाणे Thane Child Marriage : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. 29 वर्षीय तरुणानं 12 वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईतील पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिलीय.

दोघंही मुळचे सातारा जिल्ह्यातील : देशात बालविवाह करणं बेकायदेशीर असताना, या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी बालविवाह झाल्याची माहिती या अधिकाऱ्यानं दिलीय. या नराधमानं अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करुन तिला गर्भधारणा केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आलाय. यातील आरोपी पुरुष आणि अल्पवयीन मुलगी दोघंही मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुलगी चार महिन्यांची गरोदर : पनवेल येथील स्थानिक डॉक्टरांना गुरुवारी केलेल्या तपासणीदरम्यान मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती पोलिसांना दिलीय. याप्रकरणी 29 वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिली.

हेही वाचा :

  1. नाशिकमध्ये बालविवाह कायदे कागदावरच; तीन अल्पवयीन मुलींनी दिला बाळांना जन्म
  2. बालविवाह रोखण्याबाबत काय केले, सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे आदेश
  3. Child Marriage : मुली मोठ्या झाल्यावर जाड्या होतात; म्हणून आम्ही लवकर लग्न करतो, बालविवाह रोखण्यात ग्रामसेविकेला यश
Last Updated :Jan 5, 2024, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.