ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातून वाहते झुळझुळ तिरंगाचे पाणी

author img

By

Published : Aug 15, 2022, 10:39 AM IST

swirling tricolor water flows from barvi dam which supplies water to thane district for independence day
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातून वाहते झुळझुळ तिरंगाचे पाणी

ठाणे जिल्ह्याची पाण्याची मागणी वाढल्यामुळे औद्योगिक महामंडळाने बारवी धरणाच्या क्षेत्रात बाधित होणारी सात गावे आणि पाच पाड्यांचे पुतर्वसन करून १९९८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' निमित्ताने बारवी धारणाला तिरंगाचे रूप देऊन धरणातून झुळझुळ वहाणारे 'तिरंगा'च्या रंगाचे पाणी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे.

ठाणे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' उपक्रमांंतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘ हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. याअंतर्गत सर्व भारतीयांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभर हा उपक्रम घरात घरात पोचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकराने विविध संस्थाच्या माध्यामातून जनजागृतीचे कार्यक्रम राबिवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदाच लाखो ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या बारवी धारणाला तिरंगाचे रूप देऊन धरणातून झुळझुळ वहाणारे 'तिरंगा'च्या रंगाचे पाणी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले आहे.

१०६ दशलक्षघन मीटर जास्त पाणीसाठा या धरणाची पाणी साठ्याची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटरची असून पूर्णतः भरली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. ठाणे जिल्ह्याची पाण्याची मागणी वाढल्यामुळे औद्योगिक महामंडळाने बारवी धरणाच्या क्षेत्रात बाधित होणारी सात गावे आणि पाच पाड्यांचे पुतर्वसन करून १९९८ पासून धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. मात्र पुनर्वसन प्रश्नात अडकल्याने धरणाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण होण्यास २०१९ साल उजाडले. धरणक्षेत्रात बाधित होणाऱ्या सर्व ११०० कुटुंबांचे पुर्नवसन करून धरणात ३४०.७८, म्हणजेच पूर्वीपेक्षा १०६ दशलक्षघन मीटर जास्त पाणीसाठा करणे शक्य झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.