Threw stones at Mail Express : आंबिवली रेल्वे स्थनाकाजवळ मेल एक्सप्रेसवर दगडफेक; दगडफेकीत महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत...
Published: Nov 28, 2022, 1:16 PM


Threw stones at Mail Express : आंबिवली रेल्वे स्थनाकाजवळ मेल एक्सप्रेसवर दगडफेक; दगडफेकीत महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत...
Published: Nov 28, 2022, 1:16 PM
मुंब्रा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान (Mumbra Kalwa Railway Station) रेल्वेवर दगड फेक करून एका प्रवाशाला गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा आंबिवली रेल्वे स्थनाकाजवळ (Ambivali Railway Station) धावत्या मेलवर समाजकंटाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. रखमाबाई पाटील (Rakhmabai Patil) ( वय 55 रा. दिवा) असे जखमी महिला प्रवाशाचे नाव आहे.
ठाणे : मुंब्रा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान (Mumbra Kalwa Railway Station) रेल्वेवर दगड फेक करून एका प्रवाशाला गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा आंबिवली रेल्वे स्थनाकाजवळ (Ambivali Railway Station) धावत्या मेलवर समाजकंटाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. रखमाबाई पाटील (Rakhmabai Patil) ( वय 55 रा. दिवा) असे जखमी महिला प्रवाशाचे नाव आहे.
पोलिसांनी तपास सुरु केला आहे: मध्य रेल्वेच्या कल्याण - कसारा लोहमार्ग वर आंबिवली रेल्वे स्थानक असून आज सकळाच्या सुमारास या स्थनाकाजवळ धावती मेल येताच काही समाजकंटाने मेल एक्सप्रेसवर दगडफेक केली (threw stones at Mail Express). विशेष म्हणजे आंबवली रेल्वे स्थनांकाच्या दोन्ही बाजूने झोडपट्टीचा परिसरात असल्याने यापूर्वी याच भागात रेल्वेवर दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, जखमी महिला प्रवाशाला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बाई रुख्मणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दगडफेक करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
