ETV Bharat / state

Stab on Chicken Shop Owner : भावाला मारहाण केल्याच्या वादातून चिकन शॉप मालकावर धारधार शस्त्राने वार, घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Jan 21, 2023, 4:10 PM IST

Updated : Jan 21, 2023, 8:12 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

पाच वर्षांपूर्वी भावाला मारहाण केल्याच्या वादातून ठाण्यात चिकन शॉप मालकावर हॉटेलच्या गल्ल्यासमोर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

धारदार शस्त्राने वार केल्याची सीसीटीव्हीत कैद झालेली घटना

ठाणे : ठाण्यात धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिकन शॉपचा मालक आणि त्याच्या मित्राने हल्लेखोराच्या मोठ्या भावाला पाच वर्षीपूवीं मारहाण केली होती. याच रागातून हल्लेखोराने मुंबई नाशिक महामार्गवरील एका हॉटेलच्या गल्ल्यासमोरच चिकन शॉपच्या मालकावर चॉपरने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

आरोपीला पोलिसांनी केली अटक : सदर घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. भावेश वामन बेलवले (रा. डोहाळेगाव, भिवंडी) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तर बिलाल मोहंमद शेख ( वय २२) असे हल्यात जखमी झालेल्या चिकन शॉप मालकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण : जखमी बिलाल हा भिवंडी तालुक्यातील वडवली गावात कुटूंबासह राहतो. त्याचे सापे गाव येथे चिकन शॉप आहे. बिलाल हा मित्रासह मुंबई - नाशिक महामार्गवरील सागर ईन या हॉटेलमध्ये १८ जानेवारी रोजी रात्रीच्या जेवणासाठी आला होता. त्यावेळी हल्लेखोर भावेश हाही याच हॉटेलमध्ये जेवण करत होता. त्याच सुमारास बिलाल जेवणाचे बिल देण्यासाठी हॉटेलच्या गल्ल्यावर येताच पाठमागून हल्लेखोर भावेशने त्याच्या कमरेत चॉपरने वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिलाल जीव वाचविण्यासाठी हॉटेलच्या आवारात आला. इथेही त्याच्यावर चॉपरने हल्लेखोर भावेशने सपासप वार केले.

जीवघेणा हल्ल्याचा प्रकार : बिलाल शेख या हल्ल्यात गंभीर जखमी हा पडला असता, तेवढ्यात त्याच्या मित्राने भरधाव कार हल्लेखोराच्या दिशेने आणल्याने तो बाजूला झाला. हे पाहताच कार मधून सर्फराज याने बिलाल याला घेऊन पडघा ग्रामीण रुग्णालयात गाठले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १९ जानेवारी रोजी बिलाल शुद्धीवर आल्यानंतर त्याने पडघा पोलिसांना जबाब देऊन हल्लेखोर भावेश विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.

पूर्वीच्या वादातून हत्या : बिलाल शेख याने तक्रारीत नमूद केले की, हल्लखोर भावेशचा मोठा अमोल याला पाच वर्षांपूर्वी बिलाल आणि त्याचा मित्र हरिशने मारहाण केली होती. तेव्हापासून मारहाणीचा राग मनात धरून भावेश हा बिलाल याला मारण्यासाठी टपून बसला होता. सध्या बिलालवर भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पडघा पोलिसांनी हल्लेखोर भावेशचा शोध घेऊन त्याला २० जानेवारी रोजी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल साबळे यांनी दिली आहे. अधिक तपास पडघा पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : Rape on mentally challenged girl : तीन अल्पवयीन मुलांकडून गतिमंद मुलीवर रेप, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Last Updated :Jan 21, 2023, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.