ETV Bharat / state

तळोजामधील महिलेच्या खुनाची उकल, जावयानेच केला सासूचा खून

author img

By

Published : Aug 26, 2020, 12:24 PM IST

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा वसाहतीत एका 50 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना 24 ऑगस्टला सकाळी घडली. रेखा शर्मा, असे या महिलेचे नाव होते. ती तळोजा सेक्टर 11 मधील मेट्रो पॉईंट या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होती. घरात कोणीही नसताना रेखा शर्मा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हल्लेखोर फरार झाला. मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात घराच्या स्वयंपाकगृहात आढळून आली होती. मृत रेखा यांचे नातेवाईक घरी आल्यावर दुपारी ही घटना उघडकीस आली होती.

son in law arrested for murder of mother in law at taloja vasahat in navi mumbai
son in law arrested for murder of mother in law at taloja vasahat in navi mumbai

नवी मुंबई - तळोजा वसाहतीमधील एका 50 वर्षीय महिलेची हत्या झाली होती. संबधित महिलेचा मृतदेह स्वयंपाक घरात आढळून आला होता. या घटनेमुळे तळोजा परिसरात एकच खळबळ उडाली होती. संबंधित महिलेच्या खुन्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, वैयक्तिक रागापोटी जावयानेच सासूचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा वसाहतीत एका 50 वर्षीय महिलेचा खून झाल्याची 24 ऑगस्टला सकाळी घटना घडली. रेखा शर्मा, असे या महिलेचे नाव होते. ती तळोजा सेक्टर 11 मधील मेट्रो पॉईंट या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होती. घरात कोणीही नसताना रेखा शर्मा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हल्लेखोर फरार झाला. मृत महिला रक्ताच्या थारोळ्यात घराच्या स्वयंपाकगृहात आढळून आली होती. मृत रेखा यांचे नातेवाईक घरी आल्यावर दुपारी ही घटना उघडकीस आली होती.

मृत महिलेच्या मुलीचे व खून करणाऱ्या 28 वर्षीय व्यक्तीचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मृत महिलेचा या विवाहास विरोध होता. यावरून ती नेहमी जावयास घालून पाडून बोलत होती. तसेच त्याची पत्नीही सतत माहेरी राहत होती. या रागातून संबधित व्यक्तीने सासूचा गळा चिरून खून केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी 24 तासाच्या आत खुन्याला तांत्रिक तपासा अंतर्गत गजाआड केले असून, आज बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू आडागळे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.