ठाणे : देशात महागाईमुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका बसत आहे. भाजीपाला, मसाले, इंधन आणि वीज या क्षेत्रात महागाई प्रचंड वाढली आहे. महागाईमुळे ठाकरे कुटूंबाचे जगणे कठीण झाले आहे. आजारीग्रस्त पतीसह दोन मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलींचा सांभाळ कसा करावा? असा प्रश्न या 'माऊली' पुढे उभा राहिल्याने त्यांनी समाजाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. गेल्या २५ वर्षांपासून पतीसह दोन मुलींचा सांभाळ करून संसाराचा गाडा त्या हाकत आहेत.
साई फाऊंडेशन करत आहे मदत : चंद्राबाई गुरुनाथ ठाकरे या भिवंडी तालुक्यातील ज्यू नांद्रुरकी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या टेंबवली गावात राहतात. या माऊलीच्या कुटूंबाची विदारक व्यथा पाहून भिवंडीतील साई फाऊंडेशन ही गेल्या आठ वर्षापासून मदतीचा हात देत आहे. दरमहा धान्यसह जीवनावश्यक वस्तू घरपोच देऊन मानवता धर्म पाळत आहे. पती दिव्यांग मुलींवरील औषध उपचार आणि गगनाला भिडलेल्या महागाईमुळे आता जीवन जगावे कसे ? असा सवाल नातेवाईकांनीही उपस्थित केला आहे. तर त्यांनी समाजाकडून मदतीची अपेक्षा केली आहे.
चंद्राबाईचा जगण्याचा संघर्ष: चंद्राबाई या पति गुरुनाथ ठाकरे, मोनिका ठाकरे (वय२०), पुनम ठाकरे (वय २०) या दोन मुलींसह राहतात. चंद्राबाई विवाह गुरुनाथ ठाकरे यांच्याशी ४५ वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर काही वर्षात तीन मुलींना या दांपत्याने जन्म दिला. यापैकी एका मुलीचा विवाह झाला. परंतु दोन मुली मानसिकदृष्ट्या दिव्यांग जन्मास आल्या. तसेच घरात अठराविश्व दारिद्र असतानाच पती २० वर्षापासून अंथरूणावर खिळून आहेत. तेव्हापासूनच चंद्राबाईच्या जीवनात कुटूंबासाठी रोजचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. त्यातच चंद्राबाई शेतात मजुरी करूनही दोन वेळेच जेवण या कुटूंबाच्या नशिबी नव्हते.
संघटनेकडे मदतीसाठी केली याचना : अशातच या कुटूंबाची व्यथा साई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप वासू शेट्टी यांना समजली. त्यांनी कुटूंबाला मदतीचा हात दिला. गेल्या आठ वर्षापासून अन्नधान्यसह इतर जीवनाश्यक वस्तू घरपोच पुरवत आहेत. त्यामुळे या कुटूंबाचा पोटापाण्याचा प्रश्न तर सुटला, मात्र यापुढेचा येणार काळ कठीण असल्याचे पाहून चंद्राबाई यांचे नातेवाईक गणेश यांनी आगरी समाजाच्या दानशूर व्यक्तीसह समाजातील विविध संघटनेकडे मदतीसाठी याचना केली आहे. विशेष म्हणजे ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात आगरी समाजात हजारोंच्या संख्येन दानशूर व्यक्ती आहेत. तर शेकडो आगरी समाजाच्या विविध संघटनासह संस्था आहेत. यातील कोणी दानशूर अथवा संस्थेने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा गणेश ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यामातून समाजासमोर मांडली आहे.
हेही वाचा -