केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने ठाण्यात उपक्रम सुरु

author img

By

Published : Sep 21, 2021, 4:50 AM IST

Renaming of central government's labor scheme by Shiv Sena

ठाणे जिल्ह्यात ग्रामीण शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारने श्रमिकांसाठी चालू केलेल्या ई-श्रमिक रोजगार या योजनेचे नाव बदलून ते ई-शिव आधार कार्ड असे केले आहे. ठाणे जिल्ह्यात या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्यावतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून सोमवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.

ठाणे - जिल्ह्यात ग्रामीण शिवसेनेच्यावतीने केंद्र सरकारने श्रमिकांसाठी चालू केलेल्या ई-श्रमिक रोजगार या योजनेचे नाव बदलून ते ई-शिव आधार कार्ड असे केले आहे. ठाणे जिल्ह्यात या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून सोमवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या माध्यमातून जिल्ह्यात घरोघरी हजारो लाभार्थांना लाभ देण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे, असे ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी सांगितले.

ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांची प्रतिक्रिया

शिवसेनेच्या उपक्रमास भरघोस प्रतिसाद -

कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई-श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र ही योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई - श्रमिक रोजगार ही योजना ई - शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत.

असा मिळतो योजनेचा लाभ -

  • अपघाती विमा १ लाख
  • आरोग्य कुटूंब विमा २ लाख
  • बेरोजरांना रोजगार भत्ता, तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो.

ही योजना १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड, बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.

यापूर्वी आघाडी सरकारने घेतला होता 'हा' निर्णय -

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने खेळातील सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' दिला जात होता. मात्र तो पुरस्कार आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' या नावाने देण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारने लगेच आयटी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याचे जाहीर करून केंद्र सरकारला जशास तसे उत्तर दिले होते, असे राजकीय विश्लेषकांनी मत मांडली होती.

हेही वाचा - राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार, राज्य सरकारचे केंद्र सरकारला जशास तसे उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.