ETV Bharat / state

Jitendra Avhad OBC Statement : मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या घराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त; तर आव्हाड मुंबईत

author img

By

Published : Jan 5, 2022, 1:09 PM IST

Updated : Jan 5, 2022, 2:23 PM IST

ओबीसी समाजावर माझा विश्वास नाही. आरक्षणासाठी मैदानात ओबीसी समाज नाही तर दलित समाज उतरला होता. आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून त्यांचावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तर माझ्या घरावर मोर्चा येणार आहे. त्यासाठी दोन बस पुण्याहून मागवल्या आहेत. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा जय भीम, असे ट्विट स्वःत: आव्हाड यांनी केल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर लावण्यात आला आहे. ( Jitendra Avhad on OBC Community )

Police large contingent in front of minister Jitendra Avhad house over his OBC Statement
मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या घराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

ठाणे - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. मंगळवारी संध्याकाळी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून पुण्याहून आपल्या घरावर दोन बस भरून लोक येणार असल्याचे पोलिसांना कळवले होते. ( Minister Jitendra Avhad OBC Statement )

मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या घराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

काय आहे प्रकरण?

ओबीसी समाजावर माझा विश्वास नाही. आरक्षणासाठी मैदानात ओबीसी समाज नाही तर दलित समाज उतरला होता. आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून त्यांचावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तर माझ्या घरावर मोर्चा येणार आहे. त्यासाठी दोन बस पुण्याहून मागवल्या आहेत. पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा जय भीम, असे ट्विट स्वःत: आव्हाड यांनी केल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर लावण्यात आला आहे. ( Jitendra Avhad on OBC Community )

हेही वाचा - Bulli Bai App Case : मास्टर माईंड श्‍वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक; आज बांद्रा कोर्टात करणार हजर

जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील घराबाहेर दाखल झाले आहे. याआधी देखील Abvp च्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या घराबाहेर म्हाडा परीक्षा रद्दबाबत आंदोलन केलं होतं. आंदोलनाच्या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला होता. आव्हाड यांच्या घराजवळ येणाऱ्या गाड्यांकडे पोलिसांची चोख नजर आहे. प्रत्येक गाडी आणि माणसांची तपासणी केली जात आहे.

जितेंद्र आव्हाड मुंबईत -

मुंबईमधील यशंतराव चव्हाण प्रेक्षागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आढावा बैठक बोलवले आहे. त्याठिकाणी जितेंद्र आव्हाड हजर आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या घरी त्यांचे कुटुंबीय आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या नाद बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पहारा देण्याचे काम यावेळी करताना दिसत आहेत.

Last Updated : Jan 5, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.