ETV Bharat / state

धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर बापासह प्रियकराचे अत्याचार; शेजारणीच्या सतर्कतेने दोघेही गजाआड

author img

By

Published : Oct 13, 2020, 1:31 AM IST

पीडितेवर तिच्या पित्यासह प्रियकराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या अत्याचारातून बाळ जन्माला आल्याचे पीडितेने पोलिसांनी सांगितले. त्यांनतर वाशिंद पोलिसांनी २१ वर्षीय प्रियकर व नराधम बापावर पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत दोघा नराधमांना सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

ठाणे - अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह सख्या बापाने अत्याचार करून पीडितेला गर्भवती केले. त्यांनतर पीडित मुलीने एका मुलीला जन्मही दिला. मात्र शेजारी राहणाऱ्या एका सतर्क महिलेमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शाहपूर तालुक्यातील वाशिंद शहरात घडली आहे. याप्रकरणी वाशिंद पोलिसांनी नराधम प्रियकरासह अत्याचार करणाऱ्या बापालाही गजाआड केले आहे.


सूत्राने दिलेल्या माहितीनुसार १७ वर्षीय पीडिता ही गेल्या काही वर्षांपसून नवी मुंबईलगत पनवेल परिसरात कुटूंबासह राहत होती. त्यावेळी तिची ओळख शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय आरोपीसोबत होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनतर दोघांमध्ये शारीरिक संबध प्रस्थापित झाले. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण पीडितेच्या कुटंबाला लागली. त्यांनी नवी मुंबईलगत पनवेल शहरातील घर सोडून हे कुटुंब पीडितेला घेऊन शहापूर तालुक्यातील वाशिंद शहरातील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास आले होते.

या ठिकाणी पीडितेच्या नराधम बापाने फेब्रुवारी महिन्यात घरात कोणी नसताना तिच्यावर अत्याचार केला. तर प्रियकरानेही अत्याचार केल्याने ती गभर्वती राहिली होती. त्यांनतर समाजात बदमानी नको म्हणून पीडितेने स्वतःच घरातील बाथरूममध्ये अर्भकाला जन्म दिला. एक दिवसाच्या अर्भकाला पीडितेने खिडकीमधून खाली फेकले. त्यावेळी इमारतीवरून जमीनीवर काहीतरी पडले म्हणून त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने खाली जाऊन शोध घेतला. तेव्हा तिला जिवंत अर्भक दिसून आले. त्या महिलेने तत्काळ स्थानिक वाशिंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून तपास सुरू केला. मात्र, उपचारादरम्यान अर्भकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी इमारतीमध्ये चौकशी केली असता, हा पीडितेवर तिच्या पित्यासह प्रियकराने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या अत्याचारातून बाळ जन्माला आल्याचे पीडितेने पोलिसांनी सांगितले. त्यांनतर वाशिंद पोलिसांनी २१ वर्षीय प्रियकर व नराधम बापावर पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत दोघा नराधमांना सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत.


दरम्यान, मृत अर्भकाचा डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील तपास केला जाणार आहे. तर पीडित मुलीवरही अर्भकाची माहिती लपविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत वाशिंद पोलिसांनी दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.