ETV Bharat / state

Thane Crime: पायी चालताना धक्का लागल्याच्या वादातून पादचाऱ्याचा खून; आरोपीला अटक

author img

By

Published : Mar 2, 2023, 9:10 PM IST

Thane Crime
आरोपीला अटक

रस्त्याने पायी चालत असताना धक्का लागल्याच्या वादातून एका ४० वर्षीय पादचाऱ्याच्या खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे शहरातील उल्हासनगर परिसरातील कॅम्प नंबर तीन भागातील फार्व्हड लाईन परिसरातील एका इमारतीच्या समोरील रस्त्यावर घडली आहे.

खूनाच्या घटनेविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

ठाणे : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रितिक उर्फ अजय उर्फ अज्जू चौहाण (वय, २३, रा. फार्व्हड लाईन, उल्हासनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर निरंजन सूरज यादव (वय ४०, रा. खेमानी , उल्हासनगर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


धक्का लागल्यावरून वाद: मृतक निरंजन यादव हा मूळचा उत्तरप्रदेश मधील कोशिंबी जिल्ह्यातील सिंगपूर गावातील रहाणारा होता. त्याला पत्नी आणि २ मुले असून कुटूंबाच्या उदरर्निवाहसाठी उल्हासनगर मधील खेमानी भागातील एका तबेल्याजवळ एका खोलीत एकटाच रहात होता. त्यातच मृतक निरंजन हा कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हड लाईन चौक भागातील पप्पू किराणा स्टोअर्स समोरून (आज) २ मार्च रोजी पहाटे सव्वा वाजल्याच्या सुमारास पायी चालत जात होता. त्याच सुमाराला मृत निरंजनचा धक्का आरोपी अजय उर्फ अज्जू चौहाण याला लागला. मात्र केवळ चालताना धक्का लागल्याचा राग येऊन आरोपी अजयने पादचाऱ्याला मारहाण केली. यानंतर तो घटनास्थळावून फरार झाला होता. मारहाणीत निरंजनचा जागीच मृत्यू झाला.


आरोपीला अटक: या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाला मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात येऊन येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतकाची ओळख पटलेली नसतानाही पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजय उर्फ अज्जू चौहाण याला आज पहाटे काही तासातच ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. आरोपी अजय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

खुनाचा गुन्हा दाखल: दरम्यान, निरंजनच्या खून प्रकरणी पोलीस हवालदार अरुण भोईर (वय, ४६) यांच्या तक्रारीवरून आरोपी अजयवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृत निरंजन हा कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हड लाईन चौक भागात का आला ? याचा अधिक तपास पोलीस पथक करीत आहेत.

शिवीगाळ केल्याच्या रागातून खून: शिवीगाळ करणाऱ्या अशोक शामराव वाघमारे (वय ३५) तरुणाचा दोन मित्रांनी महाशिवरात्रीला धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना ठाण्यात घडली होती. उल्हासनगर शहरातील बलकनजी बारी शाळेजवळ ही घटना घडली. पप्पू उर्फ पपडया जालीदंर जाधव ( वय ३६ रा. बालकंची बारी, खेमानीरोड, उल्हासनगर ), अमित रमेश पांडे ( वय ३० रा. महालक्ष्मी प्लॉस्टजेट कंपनी, अंबरनाथ ) असे अटक केलेल्या आरोपीची नावे होती. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींना अटक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मृतकमध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून शिवीगाळ झाली होती. याचा राग मनात धरून आरोपीने अशोकला मारण्याचा कट रचला होता. त्यातच महाशिवरात्रीला रात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर तीन भागातील बालकंजी बारी शाळेजवळ ही घटना घडली. तीथे अशोक वाघमारे हा उभा असतानाच दोघा आरोपींनी अचानक येऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यातच अशोक वाघमारे यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. अखेर त्यांना पोलिसांनी शिताफीने अटक केली.

हेही वाचा: Farmer destroyed 5 acres of cabbage : कोबीचा भाव फक्त एक रुपया, वैतागलेल्या शेतकऱ्याने फिरवला 5 एकर शेतावर नांगर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.