ETV Bharat / state

...आणि एका शब्दामुळे 'तो' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

author img

By

Published : Jun 14, 2021, 8:52 PM IST

ठाणे ट्रक चालक
ठाणे ट्रक चालक

खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही सुगावा घटनस्थळी सोडला नव्हता. मात्र लुटमारी करताना या गुन्हेगाराने 'हम गांववाले है' असे बोलून वाद घेतला. या एकाच शब्दामुळे पोलिसांनी त्याला शोधून काढले. तसेच त्याच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.

ठाणे - मोबाइल व पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर (ट्रक) चालकाचा खुन करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही सुगावा घटनस्थळी सोडला नव्हता. मात्र लुटमारी करताना या गुन्हेगाराने 'हम गांववाले है' असे बोलून वाद घेतला. या एकाच शब्दामुळे पोलिसांनी त्याला शोधून काढले. तसेच त्याच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. किरण नथ्थु पाटील (वय २७ रा. शेलारगांव, ता. भिवंडी) असे खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर आझम शाबल अन्सारी (वय २८ रा. बांदा, मुंबई) असे दगडाने ठेचून खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

ट्रक चालक हत्या प्रकरण
चालकाला गंभीर जखमी करून पळाला होता आरोपी

मृतक चालक हा साथीदारासह भिवंडी नजीक काल्हेर येथील राजलक्ष्मी कम्पाऊंडमध्ये ३० मे २०१२१ रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून ट्रकच्या कॅबिनमध्येच झोपले होते. त्यावेळी आरोपी व त्याचा अल्पवीयन साथीदार चोरी करण्याच्या उद्देशाने एका दुचाकीवरून ट्रक जवळ आले. त्यांनतर अचानक ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसून मृत चालकाला धमकी देत, शिवीगाळ करीत होता. हे पाहून इतर दोन ट्रक चालक मृतक चालकाच्या मदतीला धावले असता. आरोपीने 'हम गांववाले है किधर भी घुमेंगे तु क्या करेंगा' असे बोलत वाद घालून निघून गेला. त्यानंतर त्याला पुन्हा राग आल्याने आरोपी ट्रक जवळ येऊन मृत चालक आझम याला दगड घालून गंभीर जखमी करून पळून गेला. तर चालक आझम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सापळा रचल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मृतक चालकाचा साथीदार सत्यप्रकाश सदाशिव मिश्रा (वय ३८) याच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्यासह महेंद्र जाधव, पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे, सहायक पोलीस निरीक्षक लतिफ मन्सुरी यांनी पथकासह परिसरात राहणाऱ्या रेकॉडवरील गुन्हेगार व तक्रारीशी झालेले आरोपीचे संभाषण आणि वर्णन यावरून तपास सुरु केला. त्यानंतर मिळलेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने भिवंडीतील शेलार नाका परिसरात सापळा रचून आरोपी किरण व त्याचा अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली, असता त्याने खुनाची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.

अटक आरोपीवर ७ गुन्हे

पोलिसांच्या अटकेत असलेला सराईत गुन्हेगार किरण याच्यावर भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात ३, निजामपुरामध्ये २ आणि कोनगाव पोलीस ठाण्यात २ तसेच खूनासह आणखी तीन मोबाइल चोरीचे गुन्हे नारपोली पोलीस ठाण्यात दाखल केले आहे.

हेही वाचा -कोरोनाने हवालदिल चालक पोलिसांच्या हफ्ता वसुलीने हैराण, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.