ETV Bharat / state

चोख पोलीस बंदोबस्तात दीड दिवसाच्या हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन

author img

By

Published : Aug 24, 2020, 2:50 AM IST

गणेश विसर्जन
गणेश विसर्जन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विसर्जन आपल्या दारी या उपक्रमालाही भाविकांनी प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या कृत्रिम तलावावर गणरायाला निरोप दिला. महापालिका हद्दीत ८ पोलीस ठाण्याअंतर्गत 265 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहे.

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट पाहता महापालिका हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह घरगुती हजारो गणेश मूर्तीचे विसर्जन पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पाडले आहे.

चोख पोलीस बंदोबस्तात दीड दिवसाच्या हजारो गणेश मूर्तींचे विसर्जन

विशेष म्हणजे महापालिका हद्दीत ८ पोलीस ठाण्याअंतर्गत 265 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहे. तर गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार 20 सार्वजनिक मंडळाने गणेश उत्सव रद्द केला आहे. तर 90 मंडळांनी दहा दिवस ऐवजी दीड दिवसाचा गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरवले होते. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील विविध गणेश घाटावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवून सोशल डिस्टंसिंग ठेवून दीड दिवसाच्या गणरायाला निरोप दिला.

ganesh festival
गणेश मूर्तीचे विसर्जन

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विसर्जन आपल्या दारी या उपक्रमालाही भाविकांनी प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या कृत्रिम तलावावर गणरायाला निरोप दिला. तर कल्याणमधील सर्वात मोठा गणेश घाट कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्यानजिक असून या घाटावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सोबतच उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतील दीड दिवसाचे गणेश मूर्तीचे विसर्जन रात्री दहानंतर करण्यात आले.

ganesh festival
पोलीस बंदोबस्तात दीड दिवसाच्या हजारो गणेश मूर्तीचे विसर्जन

या गणेश घाटावर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरीने मदत कार्य पोलीस व पालिका प्रशासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. रात्री १० वाजेपर्यंत सुमारे पंधरा ते वीस हजारहून अधिक घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर सुमारे 20 ते 25 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे विसर्जन याच घाटावर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.