Geeta Jain Join BJP : अपक्ष आमदार गीता जैन यांचा भाजपा प्रवेश

author img

By

Published : Jun 22, 2022, 3:56 PM IST

Geeta Jain Join BJP

राजकीय भूकंपाचे धक्के मिळाल्यानंतर गीता जैन ( Independent MLA Geeta Jain ) यांनी बुधवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांची भेट घेतली. तब्बल २० मिनीटे त्यांच्यात गुप्त चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी भाजपामध्ये ( BJP ) प्रवेश केला आहे.

मीरा भाईंदर - महाराष्ट्र राज्याचे सरकार गडगडणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. त्याच्या सोबत काही अपक्ष आमदार देखील आहेत. अशातच मीरा भाईंदर मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन हे पुन्हा स्वगृही परतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय भूकंपाचे धक्के मिळाल्यानंतर गीता जैन ( Independent MLA Geeta Jain ) यांनी बुधवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) यांची भेट घेतली. तब्बल २० मिनीटे त्यांच्यात गुप्त चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

कोण आहेत गीता जैन ? : २०१९ च्या निवडणुकीत गीता जैन यांनी तत्कालीन भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर वर्षभर त्यांनी भाजपामध्ये जाण्याचे ठरवले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतु जैन यांनी एक वर्ष भाजपाची शहर सूत्र एकहाती मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. दिल्ली पासून राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात होती. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण न झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखेर पुन्हा गीता जैन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

...म्हणून केला भाजपामध्ये प्रवेश : दोन दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीने राज्यातील सेनेतील व सेना समर्थक आमदार संभ्रमात आहेत. आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची स्थानिक सेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात अनेक खटके उडत असल्याचे दिसून आले. स्थानिक गटातटाच्या राजकारणामुळे सेनेत देखील जमत नसल्याने काहिक दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक करून स्वगृही परतणार असल्याचे मत व्यक्त केले. मात्र थोडं थांबा असे सांगण्यात आले. परंतु मंगळवारी घडलेल्या राजकीय भूकंपाने राज्यातील सत्ता परिवर्तन होणार असे चिन्ह दिसत आहे. त्याच्यामुळे गीता जैन यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा - Shivsena : 'त्या' आमदारांनी आपली निष्ठा गहाण ठेवली, शिवसैनिकांचे अश्रु अनावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.