ETV Bharat / state

Mountaineer Sisters : चिमुकल्या गिर्यारोहक बहिणींचा पराक्रम; मेहनतीने गाठला एव्हरेस्ट बेस केंम्प

author img

By

Published : Nov 2, 2022, 10:06 AM IST

कोरोना काळात एवरेस्ट सर करण्याचे छोट्या हिरकणीच्या ( Little Mountaineer Sisters ) स्वप्न २२ऑक्टोबरला एवरेस्ट बेस कॅम्प सर करत एवरेस्ट शिखर सर करण्याची काठिण्य पूर्व परीक्षा जेथे अति उंचीवर ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी मोठे आवाहन गृहीता हिने पेलून दाखवले. याचा खूप आनंद झाला, अशी माहिती गृहिताचे वडिल सचिन आणि आई स्नेहा विचारे यांनी दिली.

Little Mountaineer Sisters
चिमुकल्या गिर्यारोहक बहिणींचा पराक्रम

ठाणे : कोरोना काळात एवरेस्ट सर करण्याचे छोट्या हिरकणीचे ( Little Mountaineer Sisters ) स्वप्न २२ ऑक्टोबरला एवरेस्ट बेस कॅम्प सर करत पूर्ण केले. एवरेस्ट शिखर सर करताना अति उंचीवर ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी सहन करण्याचे मोठे आवाहन गृहीता हिने पेलून दाखवले. याचा खूप आनंद झाला, अशी माहिती गृहिताचे वडिल सचिन आणि आई स्नेहा विचारे यांनी दिली.

कोरोना काळात प्रशिक्षण : कोरोना काळात हरिता आणि गृहिता विचारे या दोघी बहिणींनी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेऊन ( Training during Corona ) जवळपास १६ ट्रेक पूर्ण केले आहेत.गिर्यारोहणाचे बाळकडू लहानपणापासून आजोबा नरेश भोसले आणि वडिल सचिन विचारे यांच्याकडून मिळत होते आणि बघता बघता या क्षेत्रात आवड निर्माण होऊन ट्रेकींग विषयी आत्मविश्वास वाढू लागला.आणि त्याची परिणीती म्हणून उणे अंश तापमानाशी झुंज देत थंडगार बोचणारे वारे, ऑक्सिजनची घसरत जाणारी पातळी या सर्व आवाहनांना सामोरे जात माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प १३ दिवसांत सर करण्यात यश मिळाले.

गिर्यारोहक बहिणींचा पराक्रम

असा झाला प्रवास : काठमांडूपासून सुरू झालेल्या या प्रवासात बहिण हरिता आणि वडिल सचिन विचारे यांनी रामेछाप हा चार तासांचा विमान प्रवास सुरवातीला केला.त्यानंतर या १४८ किलोमिटर ट्रेक करताना लुक्ला ते फाकडिंग ज्याचे अंतर २हजार ८४३ मीटर उंच, नामचे बाजार ३ हजार ३४०, टिंगबोचे आदी टप्पे पार करत मानाचा रूरा म्हणजेच ५हजार ३६४ मिटरचा एवरेस्ट बेस कॅम्प सर ( Everest base camp ) केला. परंतू या कठीण अशा प्रवासात गृहिताची बहिण हरिता विचारे हिला टिंगबोचे ३ हजार ८६० मीटर उंचीवरील आजाराचा सामना करावा लागला आणि पुढील औषधासाठी हरिताला कमी उंचीवरून परत जावे लागले. मात्र मी आणि गृहिता आम्ही दोघांनी माऊंट एव्हरेस्ट कॅम्प वर पोहचून फ्लॅग फडकावला असेही सचिन विचारे यांनी सांगितले.

Mountaineer Sisters
मेहनतीने गाठला एव्हरेस्ट बेस केंम्प

आतापर्यंतचा प्रवास : दोघी बहिणींनी आतापर्यंत दोन हजार ५९६ फूटाचा मलंगगड पासून ते महाराष्ट्रातील सर्वात उंच ५हजार ४०० फूटावरचे कळसूबाई शिखर, कर्नाळा,विशाळगड,गोपाळगड, सुवर्ण दुर्ग आदी किल्ले यशस्वीपणे सर केले असल्याचे ही सचिन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.