ETV Bharat / state

Jitendra Awhad On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना पाठवलेली नोटीस रद्द, मुंब्य्रात पोलिसांची दहशत - आव्हाड

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 7:46 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Jitendra Awhad On Uddhav Thackeray : शिवसेनेच्या शाखेवरुन ठाण्यात चांगलंच राजकारण तापलयं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बजावलेली नोटीस देखील रद्द करण्यात आली. त्यामुळं ठाकरेंना मुंब्य्रात येण्याचा मार्ग मोकळा झाला. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड, राजन विचारे यांची प्रतिक्रिया

ठाणे Jitendra Awhad On Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाखेवरून वाद सुरू आहे. यावरुन शिंदे विरुद्ध ठाकरे गट समोरासमोर आले आहे. त्यामुळंच ठाकरे गटाकडून शाखा ताब्यात घेतल्याचा आरोप वारंवार होत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मुंब्रा दौऱ्यावर आले आहेत. राजन विचारे, खासदार संजय राऊत, महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आव्हाड, महाविकास आघाडीतील काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

144 ची नोटीस कोणी दिली? : उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी पाठवलेली कलम 144 नोटीस रद्द केल्यानंतर राष्ट्रवादीचे मुंब्य्रातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “144 ची नोटीस मागं घेतल्याबद्दल मी ठाणे पोलीस आयुक्तांचं अभिनंदन करतो. आजवर माजी मुख्यमंत्र्यांना 144 ची नोटीस कोणी दिली? मुंब्य्रात पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुंब्य्रात येऊन गेले असते, मात्र गेल्या 12 तासांपासून हा मुद्दा उपस्थित केला गेला." कोणतीही गरज नसताना हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

144 अंतर्गत बजावलेले नोटीस रद्द : ठाण्यातील शाखेवरून ठाकरे गट, शिंदे गटात वाद सुरू आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या ठिकाणी येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीसही बजावली होती. त्यांना मुंब्रात येण्यापासून रोखण्यासाठी कलम 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर वातावरण तापलं होतं. आता हा वाद चिघळू नये, म्हणून पोलीस प्रशासनानं संयमाचं धोरण अवलंबलं आहे. पोलिसांनी नोटीस रद्द केली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी स्थानिक शिवसैनिकांशी भेट घेतली .

काय आहे प्रकरण : मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला होता. त्यामुळं मुंब्य्रातील वातावरण तापलंय. या शाखेची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंब्रा आले होते. मात्र त्याआधीच मुंब्रा येथे उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले होर्डिंग्स फाडण्यात आले. हे होर्डिंग्स कोणी फाडले याबाबत अद्याप कोणतीही माहीती मिळाले नाहीय. तसंच उद्धव ठाकरेंना मुंब्रात येऊ देणार नाही, असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

शिवसेनेची शाखा कोणाची? : या सगळ्या वातावरणात उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडं सर्वांच लक्षं लागलंय. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट, ठाकरे गटातील वाद अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. तर काही ठीकाणी कार्यकर्त्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून चकमक झाली होती. त्यामुळं नेमकी शिवसेनेची शाखा कोणाची? हा वाद आता नव्यानं पेटणार असल्याचं दिसतंय.

हेही वाचा -

  1. Eknath Khadse : तर, माझं विमान कायमचं लॅंड झालं असतं, मुख्यमंत्र्यांशी बोलताना एकनाथ खडसे भावूक
  2. Sharad Pawar On Diwali : पवारांची दिवाळी! माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येतात,संकटांना तोंड द्यावं लागतं - शरद पवार, पाहा व्हिडिओ
  3. MP BJP Manifesto : 'प्रत्येक कुटुंबातील एकाला मिळणार रोजगार', जाणून घ्या भाजपाच्या जाहीरनाम्यातील ५ महत्वाच्या गोष्टी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.