ETV Bharat / state

कल्याणमध्ये चिटफंड कंपनीच्या मालकांनी घातला 66 लाख 36 हजारांचा गंडा, गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 11, 2021, 10:26 PM IST

कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीच्या मालकांने गुंतवणूकदारांची तब्बल 66 लाख 36 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रहिवासी शालिनी जयवंत पाटील नामक महिलेने चिटफंड कंपनीच्या मालकांविरोधात फसवणुकीचा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

v
v

ठाणे - कल्याण पूर्वेतील प्रसिद्ध व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीच्या मालकांने गुंतवणूकदारांची तब्बल 66 लाख 36 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रहिवासी शालिनी जयवंत पाटील नामक महिलेने चिटफंड कंपनीच्या मालकांविरोधात फसवणुकीचा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरथ गोपालन नायर, त्याची पत्नी वत्सला नायर आणि मुलगा गोविंद नायर, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

कंपनीने दाखवले 15 टक्के व्याजाचे आमिष

डोंबिवलीतील निवासी विभागात राहणाऱ्या शालिनी पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीचे मालक वीरथ गोपालन नायर, पत्नी वत्सला नायर आणि मुलगा गोविंद नायर यांनी गुंतवणूकदारांची तब्बल 66 लाख 36 हजार 500 रुपयांची फसवणूक केली आहे. यापूर्वी बीएसएनएल कंपनीतून निवृत्त झालेले कल्याणचे रहिवासी सुधाकर उगडे नावाच्या व्यक्तीची 40 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. तर कोळसेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 15 टक्के व्याजाचे आमिष दाखवले होते.

व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीच्या अनेक शाखा

तक्रादार शालिनी पाटील यांनी 2006 ते फेब्रुवारी, 2021 दरम्यान 66 लाख 36 हजार रुपये गुंतवले होते. कर्ज पूर्ण झाल्यानंतरही व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीचे मालक ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. व्हीजीएन ज्वेलर्स आणि चिटफंड कंपनीच्या अनेक शाखा आहेत. 15 वर्षांपूर्वी 2006 मध्ये कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौकात ही शाखा सुरू झाली होती. सध्या शालिनी पाटील यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी कंपनीचे संचालक वीरित गोपालन नायर, पत्नी वत्सला नायर आणि मुलगा गोविंद नायर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा - VIDEO VIRAL : मंत्रालयीन अधिकाऱ्याला महिलांनी चोपले; महिलेशी अश्लील संभाषण केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.