ETV Bharat / state

Ganesh Mandals In Thane: मुख्यमंत्री ठाण्याचे तरी ठाण्यातील गणेश मंडळे अजित पवारांच्या दरबारी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 10:55 PM IST

Ganesh Mandals In Thane
अजित पवारांच्या दरबारी

गणेशोत्सव तोडांवर असल्याने गणेश मंडळांना भेडसावणाऱ्या समस्यांना घेऊन आज ठाण्यातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अनेक मागण्या मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील गणेश मंडळांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडल्या आहेत.

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत. गणेश मंडप शुल्क माफ करण्यात यावे. विसर्जन घाटासाठी विशेष निधीची तरतूद असावी, एक खिडकी योजना, पीओपी बंदी हटवण्यासाठी कायदेशीर सहकार्य, गणेश विसर्जणासाठी एक मार्ग राखीव ठेवावा आणि अशा एकीकडे मुख्यमंत्री हे ठाण्यातले असताना देखील गणेश मंडळांनी पवारांच्या दरबारी जाऊन मागण्या केल्याने मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

गणेश मंडळांनी मांडले गाऱ्हाणे: गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून ठाणे जिल्ह्यातील गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध देखावे साकारण्यात येत असतात. सध्या गणेश मंडळांकडून मंडप उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, मंडळातील कार्यकर्त्यांना परवानगी, कायदेशीर बाबी, बाप्पाचे आगमन आणि विसर्जनाची नियमावली यामुळे गणेश मंडळे अगदी मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान, या मागण्याचे निवेदन घेऊन ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवगिरी निवासस्थान गाठत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी अजित पवार यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन पुढील योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

बैठकीला 'या' पदाधिकाऱ्यांची उपस्थिती: या बैठकीला ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे अध्यक्ष समीर सावंत, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे हितेशजी जाधव, कल्याण समन्वय संस्थेचे संस्थापक सदस्य सारंग केळकर, संदीप पंडित सदस्य प्रसाद जव्हेरी तसेच ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेचे अनिरुद्ध ब्रीद, विशाल सिंह, श्रीकांत परब, यशवंत गायकवाड, प्रफुल बारदस्कर, विदेश घाडगे, अमरजीत, राकेश कोरडे, प्रेम हाडगे हे सर्व संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांची भेट नाही; पण दादांनी वेळ दिला: ठाण्यातील गणेश मंडळांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला खास वेळ दिली होती. त्यामुळे आम्ही सर्व मंडळे अजित पवार यांना भेटलो. आमच्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले. लवकरच यातून मार्ग निघेल असे आश्वासन देण्यात आले. समीर सावंत अध्यक्ष ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्था यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा:

  1. Supriya Sule On Ajit Pawar: 'राष्ट्रवादी'मध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे.. - सुप्रिया सुळे
  2. Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत आकस ठेवणाऱ्या अधिकाऱ्याच्या छाताडावर उभे राहू - संजय पवार यांनी ठोकला शड्डू
  3. Sharad Pawar Photo : काकांचा फोटो वापरू नका, पुतण्याची कार्यकर्त्यांना सूचना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.