ETV Bharat / state

Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण; चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 9:47 PM IST

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी (Nanavare Couple Suicide Case) पोलीस तपासात प्रगती होत नसल्याने धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापत संबधित पोलीस ठाण्यात भेट देऊन मोदी सरकार यांना पाठवले होते. याप्रकरणातील चार अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पुन्हा चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Nanavare Couple Suicide Case
चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी

माहिती देताना फिर्यादीचे वकील

ठाणे : गृहमंत्री फडणवीस यांचे व पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन मृतक भावाला न्याय देण्यासाठी बोट छाटून घेतल्याने, हे प्रकरण देशभर गाजत आहे. याप्रकरणातील चार अटक आरोपीना दोन वेळा न्यायालयात हजर केले असता, अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा आरोपीना हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आत्महत्या प्रकरणात भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आल्याने राजकीय वळण लागल्याची माहिती, फिर्यादीचे वकील गोपाळ भगत यांनी माहिती दिली आहे.(Nanavare Couple Suicide Case)



आरोपीवर अटकेची टांगती तलवार : कमलेश निकम, शशिकांत साठे, नरेश गायकवाड, गणपती कांबळे असे न्यायालयीन कोठडीत सुनावलेल्या आरोपींची नावे आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख , वकील नितीन देशमुख यांना अटक पूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावली होती. मात्र फिर्यादी धनंजय ननावरे यांचे वकील गोपाळ भगत यांनी सुनावलीची पुढील तारीख १ सप्टेंबर रोजी व्हावी अशी विनंती न्यायालयात केल्याने, आता मुख्य आरोपीसह खासदार निंबाळकर आणि इतर आरोपीवर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती वकील भगत यांनी दिली आहे.

उल्हासनगर परिसरात केली आत्महत्या : दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी १ ऑगस्टला पत्नी उज्वलासह उल्हासनगर ४ नंबर परिसरात आत्महत्या केली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात सुरवातीला मुख्य आरोपी संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केले. त्यानंतर आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.

उजव्या हाताचे बोट छाटले : पोलिसांनी घटनेच्या दिवशी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या खिश्यात एक चिट्ठीही मिळाली होती. या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा ओमी टीम कलानीचा खासम खास कमलेश निकम, शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचा स्वीय सहाय्यक शशिकांत साठे, राष्ट्रवादीचा नेते नरेश गायकवाड, गणपती कांबळे यांची ही नावे आढळून आली होती. त्यानंतर व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येला अठरा दिवस झाल्यानंतर ही पोलीस तपासाला वेग देत नाही. उलट गुन्हे शाखा प्रकरणाच्या तपास गुंडाळण्याचा मागे लागल असल्याचा आरोप केला होता. यावेळी मृतकचे भाऊ धनंजय ननावरे यांनी त्यांच्या उजव्या हाताचे एक बोट छाटून ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत, प्रत्येक आठवड्याला शरीराच्या एक एक अवयव छाटून पाठवणार असल्याचा इशारा, धनंजय यांनी व्हायरल व्हिडिओ करून दिला होता.



२४ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती : दरम्यान या प्रकरणात भाजपचे खासदार निंबाळकर यांचे नाव असल्याने पोलीस प्रशासनाकडून योग्य तपास होत नसल्याचा आरोप, वकील भगत यांनी केला. त्यांनी हे गंभीर प्रकरण उच्च न्यायालयाच्या नजरे समोर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रकरणात आणखी संशयित मोठे नावे समोर आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. चार अटक आरोपींना १८ ऑगस्ट रोजी हजर केले असता, कोठडी २४ ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता, २८ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा हजर केले असता चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती फिर्यादी यांचे वकील गोपाळ भगत यांनी दिली आहे.



खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या तपास कधी होणार ? : 2015 मध्ये रामराजे निंबाळकर यांच्या समर्थकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवल्यावर नंदकुमार ननावरे आणि त्यांचे कुटुंब फलटण सोडून पुन्हा उल्हासनगर मध्ये स्थिरावले होते. त्यावेळी ननावरे यांनी आमदार ज्योती कलानी त्यांच्याकडे स्विय सहाय्यक म्हणून काम सुरू केले. ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यावेळी रामराजेही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यामुळे ज्योती कलानी यांनी मध्यस्थी केल्यामुळे ननावरे यांनी ॲट्रॉसिटीच्या पुण्यातून माघार घेतल्याची चर्चा शहरात आहे. सदरचा गुन्हा शेवटच्या टप्प्यात कोर्टात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर उज्वला नंदकुमार ननावरे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा मध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे भाऊ संजूबाबा नाईक निंबाळकर यांनाही आरोपी बनवण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.

ननावरे कुटुंबावर दबाव टाकत होते? : रामराजे यांचे राजकारणातील कट्टर विरोधक हे सध्याचे माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आहेत. सदरच्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये रामराजे निंबाळकर यांना अडकवून त्यांच्या समर्थकाना क्लीन चिट मिळू नये यासाठी, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ननावरे कुटुंबावर संग्राम निकाळजे मार्फत दबाव टाकत होते का ? या प्रश्नाचे उत्तर पोलीस तपासात अद्यापही समोर आलेले नाही.

हेही वाचा -

Nanavare Couple Suicide Case : दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Nanavare Couple Suicide Case: ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आरोपीला पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी

Nanavare Couple Suicide Case : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; भावाने 'बोट' छाटून गृहमंत्र्यांना इशारा देताच चार आरोपींना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.