ETV Bharat / state

Cheated By Bunty Bubli : भाजपच्या माजी नगरसेवकाला बंटी बबलीने लावला २२ लाखाचा चुना

author img

By

Published : May 13, 2023, 9:37 PM IST

भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश माने यांना बंटी बबलीच्या जोडीने २२ लाखाचा चुना लावल्याची घटना घडली आहे. हितेश साधुराम पंजाबी (वय ४७), पूजा हितेश पंजाबी (वय ४५, रा. शिवलिला सोसायटी, कँम्प नंबर १ उल्हासनगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या बंटी बबलीचे नाव आहे. तर प्रकाश शांताराम माने ( वय ५५, रा. सुवर्ण सोसायटी, डोंबिवली पूर्व) असे फसवणूक झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

FRAUD
FRAUD

ठाणे : डोंबिवलीतील एका भाजपच्या नगरसेवकाला उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या बंटी बबलीच्या जोडीने गुंतवणुकी केलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम देण्याचे आमिष दाखवून २२ लाख ७० हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात बंटी बबलीच्या जोडीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अनेक नागरिक आरोपी बंटी बबलीच्या जाळ्यात : तक्रारदार प्रकाश माने हे १९९५ साली भाजपचे नगरसेवक म्हणून कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आले होते. त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केल्याने ते सद्या शिंदे समर्थक जेष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शिवाय डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील मानपाडा रस्त्यावरील मध्यवर्ति शिवसेना कार्यालयाचे प्रमुख आहेत. त्यातच सन २०१९ पूर्वी आरोपी बंटीची एका कामाच्या ठिकाणी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने माने यांना सांगितले कि, माझ्या कार्यलयात येऊन बस तुला काम मिळाले. त्यामुळे आरोपी बंटी हा दरदिवशी कार्यलयात येत असे, त्यानंतर त्याने माने यांच्या एका नातेवाईकाला गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याला सुरुवातीला गुंतवणुक केलेल्या रक्कमे पेक्षा अधिक रक्कम परत देऊन त्याचा विश्वास संपादन केला. याच नातेवाईकाने आरोपी बंटीच्या गुंतवणुकीचा प्रचार केल्याने अनेक नागरिक आरोपी बंटी बबलीच्या जाळ्यात अडकत गेले.

२२ लाख रुपये गुंतविले : माजी नगरसेवक माने हेही २०१९ ते मे २०२३ या कालावधीत आरोपी बंटी बबलीने आम्ही जिन्स कारखान्यामध्ये काही पैसे गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हालाही आकर्षक परतावा मिळेल असे आमिष दाखवले होती. त्यांच्या अमिषाला बळी पडून गुंतवणुकीचा निर्णय माने यांनी घेतला. सुरुवातीला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक ३५ दिवसांनी ५० हजार रुपये असा आरोपी बंटी बबलीने गुंतवणूक करताना थाप मारली होती. विशेष म्हणजे माने यांनी या योजनेसाठी कर्ज काढून रोख स्वरुपात एकूण २२ लाख रुपये गुंतविले होते.

इतरही नागरिकांची ७० लाखांची फसवणूक : गुंतवणुकीनंतर माने यांना दर महिन्याला ठराविक परतावा मिळणे अपेक्षित होते. मात्र आरोपी बंटी बबली वेळोवेळी खोटी कारणे देऊन आकर्षक व्याज देण्यास माने यांना टाळाटाळ सुरू केली. तसेच माने यांना आरोपीने सांगितले कि, तुमचे एक कोटी होऊन द्या, ती रक्कम तुमच्या घरासाठी होईल असे सांगून मागील तीन वर्षापासून आरोपी बंटी, बबलीने थापा मारण्याचा प्रकार सुरू ठेवला होता. विशेष म्हणजे या आरोपींनी माझ्यासह इतरही नागरिकांची ७० लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारदार माने यांनी सांगितले.

बंटी बबली विरोधात गुन्हा दाखल : आकर्षक व्याज मिळत नसल्याने माने यांनी मुद्दल रक्कम परत करण्यासाठी आरोपी बंटी बबलीकडे तगादा लावला. मात्र, ती रक्कम परत करण्यास आरोपी टाळाटाळ करू लागले होते. त्यानंतर व्याजा बरोबर मूळ रक्कम परत मिळत नसल्याने पाहून माजी नगरसेवक यांनी बंटी हितेश, बबली पूजा या दोघावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्हाचा पोलीस उपनिरीक्षक के. व्ही. हासगुळे तपास करत आहेत.

  • हेही वाचा -
  1. Karnataka Election Result : कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयामागे आहे 'हे' प्रमुख कारण, जाणून घ्या..
  2. Uddhav Thackeray On Karnataka Result : कर्नाटकात सामान्य माणसाकडून हुकूमशाहीचा पराभव - उद्धव ठाकरे
  3. Congress Majority For Karnataka : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 136 जागांवर विजय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.