ETV Bharat / state

Dog Owner Knife Attack : पाळीव कुत्रांच्या वादातून कुत्र्याच्या मालकाचा शेजाऱ्यावर चाकू हल्ला

author img

By

Published : May 17, 2023, 8:54 PM IST

पाळीव कुत्र्यांना आवरा असे बोलण्याने कुत्र्यांच्या मालकाने वयोवृद्ध शेजाऱ्यावर चाकू हल्ला केला आहे. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

dog owner knife attack
कुत्र्याच्या मालकाचा शेजाऱ्यावर चाकू हल्ला

ठाणे : पाळीव कुत्र्यांना आवरा असे बोलणे एका वयोवृद्ध शेजाऱ्याला महागात पडले आहे. कुत्र्यांना आवरा असे कुत्र्याच्या मालकाला सांगितल्यानंतर त्या मालकाने वयोवृद्ध शेजाऱ्यावर चाकू हल्ल्या केला आहे. ही घटना हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीमधील लेगसाईड, लेकशोअर, इमारतीत घडली आहे. याप्रकरणी चाकू हल्ला करणाऱ्या कुत्र्याच्या मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल : विशेष म्हणजे शेजारी राहणाऱ्या कुत्र्याच्या मालकाचे नाव तक्रारदार यांना माहिती नसल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव अशोककुमार ठठू ( वय ७०, रा. लेगसाईड, लेकशोअर, पलावा सिटी, डोंबिवली) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अशोककुमार हे हायप्रोफाईल सोसायटी असलेल्या पलावा सिटीमधील लेगसाईड, लेकशोअर, इमारतीत राहतात. तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी शेजाऱ्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत. त्यातच १६ मे रोजी सकाळच्या सुमारास अशोककुमार हे नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले होते. त्यावेळी शेजारच्या घरातील कुत्र्यांच्या मालकाने त्याच्याकडील दोन पाळीव कुत्रे मोकळे सोडले होते. ते पलावा सिटीत फिरत होते.

भाई साहब कुत्ते को ऐसे मत छोडे, म्हणताच मालकाला आला राग : हे दोन कुत्रे पाहून अशोककुमार यांना कुत्र्यांची भीती वाटल्याने त्यांनी कुत्र्याच्या मालकाला सांगितले, भाई साहब कुत्ते को ऐसे मत छोडे, काटने डर लगता है, उसको पट्टेसे बांधलो, असे अशोककुमार म्हणाले. अशोक कुमार यांचे बोलणे कानावर पडताच कुत्र्याच्या मालकाला राग आला. त्यानंतर त्याने अशोककुमार यांचे काहीही ऐकून न घेता अशोककुमार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला. शिवाय हल्लेखोर कुत्राच्या मालकाने तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही अशोककुमार यांना दिली. अशोककुमार हे चाकू हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करून आज सकाळी त्यांना घरी सोडण्यात आले.

पोलिसात तक्रार दाखल : दरम्यान त्या अज्ञात शेजाऱ्याकडून जीवाला धोका निर्माण होणार असल्याने अशोककुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शेजारी राहत असलेल्या कुत्र्याच्या मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वंजारे करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Thane Crime: बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्या आठ ट्रकवर कारवाई, वनविभागाकडून गुन्हा दाखल
  2. Thane Crime : 'संडे, मंडे'चे 'स्पेलिंग' येत नाही, म्हणून सहा वर्षीय विद्यार्थ्यास शिक्षिकेकडून अमानूष मारहाण
  3. IT Engineer Murder Case Pune: आयटी इंजिनियरची 3 हजार रुपयांसाठी केली हत्या; दोन आरोपींना अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.