ETV Bharat / state

Eknath Shinde In Army : '..तर कदाचित आज मी सैन्यात असतो', एकनाथ शिंदेंनी सांगितली सैन्याचे ट्रेनिंग सोडल्याची कहाणी

author img

By

Published : May 6, 2023, 4:03 PM IST

आज मी राजकारणात नसतो तर कदाचित भारतीय सैन्यात सैनिक म्हणून राहिलो असतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा शेअर केला आहे.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जीवनाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. मी प्रशिक्षणासाठी जात असताना वाटेत माझा प्लॅन बदलला नसता तर कदाचित मी आज भारतीय सैन्यात सेवा करत असतो, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी शिवसेनेशी बंड करून मुख्यमंत्री बनलेल्या 59 वर्षीय एकनाथ शिंदेंनी सांगितले की, त्यांना त्यांच्या या निर्णयाबद्दल खेद वाटत नाही. त्यांची भारतीय सैन्यात निवड झाली होती आणि त्यांना लखनौमध्ये प्रशिक्षण घेण्यास बोलवण्यात आले होते, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

प्रशिक्षणाला जाताना मार्ग बदलला : शिंदे म्हणाले की, प्रशिक्षणासाठी लखनौला जाताना त्यांना त्यांचे मित्र हरी परमार यांचे हरियाणातील रोहतक येथे एका लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आठवले. त्यानंतर त्यांनी मार्ग बदलला आणि दिल्लीहून रोहतक गाठले. तीन - चार दिवसांनंतर ते लखनौ येथील प्रशिक्षण केंद्रात पोहोचले. मात्र, शिंदे यांना सांगण्यात आले की त्यांची बस चुकली असून त्यांनी प्रशिक्षणासाठी नव्याने वॉरंट घेऊन परत यावे. शिंदे म्हणाले की, मुंबईत परतल्यावर तिथे दंगली सुरू होत्या आणि त्यामुळे त्यांनी हे प्रकरण जसेच्या तसे सोडले आणि ते पुढे राजकारणात यशस्वी झाले.

'सैनिक नाही पण शिवसैनिक झालो' : एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, रोहतकमधील लग्नाच्या वेळी एका पाहुण्याने आपले शब्द पाळल्याबद्दल आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. आताही मी माझा शब्द पाळतो आणि हे माझ्या वागणुकीतून नेहमीच दिसून येते, असे ते म्हणाले. शिंदे म्हणाले की, सामाजिक कार्य आणि राजकारणातील व्यस्त वेळापत्रकामुळे ते कुटुंबासाठी जास्त वेळ देऊ शकले नाहीत, मात्र त्यांच्या पत्नीने सर्वांची काळजी घेतली. त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे मोठा होऊन यशस्वी डॉक्टर आणि राजकारणी बनला. श्रीकांत शिंदे हे लोकसभेत कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शिंदे म्हणाले की मी सैन्यात सेवा करू शकलो नाही पण मी शिवसैनिक झालो.

हेही वाचा :

  1. Eknath Shinde : मराठी बहुभाषिकांच्या जखमेवर मुख्यमंत्री चोळणार मीठ, कर्नाटकात करणार भाजपचा प्रचार
  2. Support Barsu refinery : मातोश्रीवर खोके पोहोचावे यासाठी ठाकरेंचा रिफायनरीला विरोध, समर्थन मोर्चात राणेंची सडकून टिका
  3. Uddhav Thackeray Visit To Barsu: शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत - उद्धव ठाकरेंचा निशाणा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.