ETV Bharat / state

Tushar Deshpande News :वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेची बालपणाच्या मैत्रिणीकडून 'विकेट', डिसेंबरमध्ये करणार विवाह

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 7:49 PM IST

Updated : Sep 15, 2023, 9:48 PM IST

Tushar Deshpande News
Tushar Deshpande News

Tushar Deshpande News भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा कल्याणमधीर रहिवाशी आहे. त्याने अडचणींवर मात करत मिळवेलेले यश अनेकांना प्रेरणादायी ठरेल, असे आहे. बालपणीची मैत्रीण असलेल्या नभा गंडबरशी तुषार हा डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहे.

क्रिकेटपटुचा शाळेकडून सत्कार

ठाणे Tushar Deshpande News : आयपीएल क्रिकेटचं मैदान गाजविणाऱ्या कल्याणमधील वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा चेन्नई सुपर किंग्जच्या टीममध्ये उत्कृष्ठ खेळाडू ठरला आहे. तुषार देशपांडेची २००७ साली मुंबईतील १३ वर्षीखालील मुलांच्या संघात निवड पाहता, तेव्हापासूनच त्याने क्रिकेट जगतात भरारी घेतलीय. मात्र त्याची क्रिकेटच्या बाहेरीलही इनींगही थक्क करणारी आहे. त्याची शालेय जीवनापासून मैत्रिण असलेल्या 'नभा'शी लग्न गाठ बांधली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात असल्याने दोघांची भेट झाली नव्हती. मात्र चार वर्षांपूर्वीच या दोघांची पुन्हा सोशल मीडियावर ओळख होऊन प्रेमाचे सुत जुळले होते.



तुषार देशपांडेचा जन्म १५ मे १९९५ झाली झाला. त्याचे आईवडील दोघेही सरकारी नोकरी होते. तुषारचे वडील उदय देशपांडे यांनाही किक्रेटची खूप आवड आहे. तेही किक्रेट खेळत होते. तुषारनं कल्याणमधील केसी गांधी स्कुलमध्ये शिक्षण घेतले. याच स्कुलच्या मैदानात तुषारनं किक्रेटचे धडे गिरवले आहे. विशेष म्हणजे याच स्कुलमधून हजार धावांचा जागतिक रेकॉड करणारा प्रणव धनावडेही किक्रेट जगतात विक्रमवीर ठरला होता. त्याच्यानंतर तुषार हा जागतिक स्थरावरील वेगवान गोलंदाजापैकी एक ठरला आहे.

  • 𝙒𝙚 𝙖𝙧𝙚 𝙩𝙝𝙚 𝘾𝙝𝙚𝙣𝙣𝙖𝙞 𝘽𝙤𝙮𝙨
    𝙈𝙖𝙠𝙞𝙣𝙜 𝙖𝙡𝙡 𝙩𝙝𝙚 𝙣𝙤𝙞𝙨𝙚
    𝙀𝙫𝙚𝙧𝙮𝙬𝙝𝙚𝙧𝙚 𝙬𝙚 𝙜𝙤! 🥳🥳#CHAMPION5 #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/yw9sv30xLz

    — Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इंडिया ए प्लेयर म्हणून निवड- आयपीएल सुरू होण्याआधी यंदाच्या मोसमात मुंबई संघातून तुषार हा सहा रणजी सामने खेळाला. तर नुकताच झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघातून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तुषारने गोलंदाजी करत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा बळी घेतला होता. आयपीएलमधील उत्तम गोलंदाज असल्याची पुन्हा चुणूक दाखवल्याने त्याला यंदाचा इंडिया ए प्लेयर म्हणून निवड झाली आहे.

तुषारचे वडील उदय देशपांडे सांगतात की, तुषारला क्रिकेटच्या मैदानावरील आव्हानात्मक काळातही त्याने स्वतःला सावरले. विशेष म्हणजे 2019 मध्ये कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर त्याच्या आईचा मृत्यू झालानंतर संपूर्ण कुटुंबासाठी सर्वात मोठी परीक्षा होती. एकुलता एक मुलगा असल्याने हा धक्का सहन करणे त्याच्यासह माझ्यासाठीही कठीण होते. त्याकाळात “तो खूप अस्वस्थ झाला होता. त्याची आई गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे पेट्रोलियम शील्ड (ऑफिस साइड भारत पेट्रोलियमसाठी) स्पर्धा त्याला गमावली लागली होती. त्यानंतरही , मी त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.

माझ्या पत्नीने दोन वर्षे जगण्यासाठी खूप संघर्ष केला. तुषारच्या आईला तुषारला चांगल्या स्तरावर खेळताना पाहायचे होते. आईचे निधन झाले त्या वर्षी तो भारत अ संघासह सर्व स्पर्धा खेळला आहे-क्रिकेटपटू तुषारचे वडील उदय देशपांडे

डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार - तुषारच्या आईचा मृत्यूच्या दुसऱ्या दिवशीच इंदूरला मुश्ताक अली ट्रॉफी खेळायला गेल्याची आठवण त्याचे वडील उदय सांगतात. जेव्हा तुम्ही जमिनीवर असता, तेव्हा तुम्ही सैनिकासारखे असता, तेव्हा तुमच्या मनात भावना नसतात. त्याला मी तसचं घडवलं आहे. त्याची केशरचनाही सैनिकासारखी आहे. तो युनायटेड इंडिया इन्शुरन्स संघाकडून क्रिकेट खेळला होता. तुषारची बालपणीची मैत्रीण असलेल्या नभा गंडबर ही आर्टिस्ट आहे. तिच्याशी तो डिसेंबर महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याचे तुषारने सांगितले. दरम्यान, (आज) शुक्रवारी तुषारचा शाळेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन गौरव सोहळा पार पडला. या सोहळ्यात सर्वच शिक्षक आजी माजी विद्यार्थ्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

हेही वाचा-

  1. Ind Vs Ban Asia Cup : भारत-बांग्लादेश सामना, भारताचीही सुरुवातीलाच पडझड सुरू; कर्णधार रोहित शर्मानंतर तिलक वर्माही तंबूत परतला
  2. PAK vs SL Asia Cup Super 4 : श्रीलंकेचा पाकिस्तानवर धडाकेबाज विजय, फायनल मुकाबला भारतासोबत
Last Updated :Sep 15, 2023, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.