ETV Bharat / state

Thane Nagar Panchayat Election : मुरबाडमध्ये भाजप तर शहापुरात शिवसेनेने मारली बाजी.. काँग्रेस, राष्ट्रवादी 'झिरो'

author img

By

Published : Jan 19, 2022, 8:10 PM IST

मुरबाडमध्ये भाजप तर शहापुरात शिवसेनेने मारली बाजी.. काँग्रेस, राष्ट्रवादी 'झिरो'
मुरबाडमध्ये भाजप तर शहापुरात शिवसेनेने मारली बाजी.. काँग्रेस, राष्ट्रवादी 'झिरो'

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर व मुरबाड नगर पंचायतीच्या निवडणुकीत मुरबाडमध्ये भाजप तर शहापुरात शिवसेनेनं बाजी मारली. मात्र या दोन्ही नगर पंचायतीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले ( Murbad Shahapur Nagar Panchayat Election Result ) नाही.

ठाणे: ठाणे जिल्हयातील शहापूर व मुरबाड नगरपंचायत निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. यापैकी मुरबाडमध्ये पुन्हा भाजपने सत्ता कायम राखली, तर शहापूरमध्ये शिवसेनेची सरशी होऊन नगरपंचायतीवर पुन्हा भगवा फडकविण्यात सेना नेत्यांनी यश संपादन केले ( Murbad Shahapur Nagar Panchayat Election Result ) आहे.

मुरबाडमध्ये भाजप तर शहापुरात शिवसेनेने मारली बाजी.. काँग्रेस, राष्ट्रवादी 'झिरो'

कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या पदरी घोरनिराशा..

मुरबाडमध्ये १७ जागांपैकी १० जागेवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेला ५ जागेवर विजयी मिळवून समाधान मानावे लागले. तसेच अपक्ष २ जागेवर निवडून आले आहेत. शहापूर नगरपंचायतमध्ये १७ जागा पैकी १० जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपने ७ जागा जिंकून सेनेला टक्कर दिली. आहे. मात्र दोन्ही नगरपंचायतीत कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या पदरी घोरनिराशा पडली आहे. त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नसल्याने पुन्हा दोन्ही सत्तेमध्ये असलेल्या पक्षातील नेत्यांनी स्थानिक नेतृत्वात बदल करण्याची मागणी या निकालावरून पुढे आली आहे. विशेष म्हणजे शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा असूनही त्यांना दारुण पराभव या निवडणुकीत पाहावा लागला. तर मुरबाडमध्ये भाजपचे आमदार किसन कथोरेने आपला गड कायम राखला.

विधानसभा निवडणूकीचे राजकीय भवितव्य ठरणार

ठाणे जिल्हयातील मुरबाड व शहापूर नगरपंचायतीवर एक हाती निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी भाजपा शिवसेनेने येथे प्रचंड राजकीय ताकद सेना व भाजप नेत्यांनी लावली होती. कुठल्याही परिस्थितीत नगरपंचायत निवडणुकीत यश संपादन करयाचेच यासाठी खुद्द भाजपाचे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, भाजप आमदार किसन कथोरे , तर शिवसेनेचे राज्यातील नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. ठाणे जिल्ह्यातील राजकारणातील या चार वजनदार नेत्यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लावल्याने शहापूर व मुरबाड नगरपंचायतीवर शिवसेना की भाजपा या दोन्ही पक्षांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र आजच्या निकालावरून दोन्ही पक्षातील नेत्यांनी आपआपला गड कायम राखला आहे. विशेष म्हणजे याच निवडणुकीच्या निकालावरून पुढील विधानसभा निवडणूकीचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी ओतला प्रचारात जीव ..

शिवसेनेसोबत नगरपंचायत निवडणुकीत कडवी झुंज देण्यासाठी शिवसेनेतील नाराजांना भाजपाने उमेदवारी देऊन शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याची राजकीय रणनीती आखली. परंतु भाजपाची ही राजकीय खेळी उलथवून टाकला. शिवसेनेनेदेखील शहापूर नगरपंचायतीचा गड कायम राखला. विशेष म्हणजे निवडणुकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे बारीक लक्ष ठेऊन होते. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे हे शहापूर व मुरबाड शहरात ठांण मांडून होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.