ETV Bharat / state

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून युवकावर चाकू हल्ला

author img

By

Published : Feb 9, 2021, 12:05 PM IST

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका भावाने तीन मित्राच्या साथीने युवकावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

attack on  youth on suspicion of having love affair with sister in thane
बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून युवकावर चाकू हल्ला

ठाणे - आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका भावाने तीन मित्राच्या साथीने युवकावर चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील ऑडन्स कंपनीच्या वसाहतीत घडली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. दत्तू आत्माराम कीर्तिकर, असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर ईश्व्रर वलपल्ली, रोहित, लतेश, सूरज असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

घरा बाहेर उभा असताना चाकू हल्ला -

दत्तू आत्माराम कीर्तिकर हा युवक कुटुंबासह अंबरनाथ शहरातील ऑडन्स कंपनीच्या वसाहतीत राहत असून तो एका वाहनावर चालक म्हणून काम करतो. तर याच परिसरात आरोपीचे घर असून त्याच्या बहिणीशी दत्तू याचे प्रेमसबंध असल्याचा संशय आरोपीला होता. त्यातच त्याने तीन मित्राच्या साथीने काल रात्रीच्या सुमारास दत्तू घराबाहेर असतानाच अचानक आरोपींनी वाद घालून चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दत्तू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हेही वाचा - 'मागील सरकारच्या अर्थमंत्र्यांनी एकाच्या तोंडचा घास हिसकावून दुसऱ्याला दिला'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.