ETV Bharat / state

Attacked On Senior Citizen: दोन बहिणींकडून शेजारच्या ज्येष्ठ नागरिकाच्या गुप्तांगावर प्रहार; जाणून घ्या कारण...

author img

By

Published : Jun 23, 2023, 5:49 PM IST

शेजारी शेजारी लागून असलेल्या बंगल्यात राहणारे दोन शेजारी पक्के वैरी झाल्याची घटना समोर आली आहे. झाडांच्या कुंडीसाठी कट्टा बांधल्याच्या वादातून दोन बहिणींनी मिळून शेजारच्या बंगल्यातील एका ६५ वर्षीय वयोवृद्धाच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारून त्यांना जखमी केले. ही घटना कल्याण पश्चिम भागातील फॉरेस्ट कॉलनीमधील बंगल्यात घडली आहे.

Attacked On Senior Citizen
ज्येष्ठ नागरिकाच्या गुप्तांगावर प्रहार

ठाणे : याप्रकरणी वयोवृद्धाच्या तक्रारीवरून हल्लेखोर दोन बहिणींवर विविध कलमांनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तम कोमरु जाधव (वय ६५) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर चित्रा खाडे आणि तिची मोठी बहिणी असे गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही बहिणींची नावे आहेत.

कुंड्यांच्या कट्ट्यावरू वादावादी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार उत्तम जाधव हे कल्याण पश्चिम भागातील फॉरेस्ट कॉलनीमधील ओम सिद्दी विनायक संकुलमध्ये कुटुंबासह राहतात. तर त्यांच्या शेजाऱ्याच्या बंगल्यात आरोपी महिला राहते. त्यातच २० जून रोजी तक्रारदार उत्तम यांनी फॉरेस्ट कॉलनीमधील बंगल्यालगतच्या सार्वजनिक भिंतीलगत झाडांच्या कुंडी ठेवण्यासाठी सिमेंटचा कट्टा बांधला होता; मात्र या कट्ट्याला आरोपी बहिणींनी विरोध केला. त्यांनी उत्तम यांना सार्वजनिक भिंतीला कुंडी ठेवण्यासाठी कट्टा का बांधल्याचा जाब विचारला. यावेळी तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल तिथे करा, असे तक्रारदार उत्तम जाधव यांनी दोन्ही बहिणींशी बोलून बंगल्यात निघून गेले.

वृद्धावर पहारीने हल्ला : त्यानंतर काही वेळाने आरोपी दोन्ही बहिणी तक्रारदार जाधव यांच्या बंगल्यात लोखंडी पहार घेऊन शिरल्या. त्यांनी दरवाज्यावर पहारीने जोरजोरात ठोठावले त्यावेळी जाधव हे बाहेर येऊन स्वतःच बांधलेला कट्टा २० जून रोजी दुपारच्या सुमारास तोडत असतानाच, दोन्ही बहिणींनी अचानक त्यांच्यावर लाथाबुक्याने हल्ला करत लोखंडी पहारीने बेदम मारहाण केली. या दरम्यान दोघी बहिणींनी जाधव यांच्या गुप्तांगावर जोरात लाथ मारून त्यांना जखमी केले. उपचारातून बरे झाल्यानंतर जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बहिणींवर तक्रार दिली. त्यानुसार विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. केदार करीत आहेत.

हेही वाचा:

  1. Talking Hijacking in Flight : विमानात प्रवाशाकडून हायजॅकबद्दल संभाषण; क्रू कर्मचाऱ्याने ऐकले अन्....
  2. Mumbai Police Threat Call : मुंबईसह पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणणार; मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन
  3. Pune Crime News: कामाचे पैसे मागितले म्हणून पुण्यात 'या' भाजप नेत्याच्या पुतण्याकडून लेबर कॉन्ट्रॅक्टरला जबर मारहाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.