ETV Bharat / state

ठाण्यात बांधकाम साईटवरील सॅम्पल प्लाटला लागली आग

author img

By

Published : Feb 9, 2021, 11:52 PM IST

Updated : Feb 10, 2021, 12:55 AM IST

ठाण्याच्या मॉडेला चेकनाका परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सॅम्पल प्लाटची निर्मिती सुरू असताना अचानक आग लागली. या आगीने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले.

Sample Plat Fire Thane
सॅम्पल प्लाट आग ठाणे

ठाणे - ठाण्याच्या मॉडेला चेकनाका परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सॅम्पल प्लाटची निर्मिती सुरू असताना अचानक आग लागली. या आगीने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती संतोष कदम यांनी दिली.

आग लागल्याचे दृष्य

हेही वाचा - कल्याणातील धोकादायक इमारतीमधील मंडपच्या साहित्याला आग

आज संध्याकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सॅम्पल प्लाट बनविण्याचे काम सुरू असतानाच अचानक आग लागली. आगीने रौद्र स्वरूप धारण केले होते. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक, २ फायर इंजिन, एक जम्बो वॉटर टँकर, एक वॉटर टँकर आणि २ रेस्क्यू वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न चालू आहे. आग नेमकी कशाने लागली याबाबत कुठलीच माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

आग लाण्याच्या घटनांमध्ये वाढ

ठाण्यामध्ये मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून यामागे शॉर्टसर्किट हे प्रमुख कारण दिसत आहे. मागील काही दिवसात लागलेल्या आगीचे प्रमाण जास्त असून प्रशासनाने लागलीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - ‘जीवनसाथी'वर ओळख झालेल्या भामट्याने 'युके'त डॉक्टर असल्याचे सांगून लावला १६ लाखांचा चुना

Last Updated :Feb 10, 2021, 12:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.