ETV Bharat / state

Ganeshotsav 2022 ठाण्यात अवतरली अयोद्धा नगरी, यंदा गणेशोत्सवासाठी 120 फूट उंचीच्या राम मंदिराचा देखावा

author img

By

Published : Aug 30, 2022, 12:12 PM IST

भिवंडी शहरातील एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेले धामणकर नाका मित्र मंडळ Dhamankar Naka Mitra Mandal Bhiwandi यंदा साकारणार अयोध्येतील श्री राम मंदिराची १२० फूट उंचीची Shri Ram Temple In Ayodhya नयनरम्य प्रतिकृती उभारत असून सदर प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Shri Ram Temple In Ayodhya
श्री राम मंदिर

ठाणे भिवंडी शहरातील एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेले धामणकर नाका मित्र मंडळ Dhamankar Naka Mitra Mandal Bhiwandi सार्वजनिक गणेशोत्सवाच्या Public Ganeshotsav Mandal Bhiwandi ३४ व्या वर्षी अयोध्येतील श्री राम मंदिराची Shri Ram Temple In Ayodhya १२० फूट उंचीची नयनरम्य भव्य प्रतिकृती उभारत असून सदर प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता व आकर्षण दिसून येत आहे.

भिवंडीत यंदा गणेशोत्सवात अयोध्येतील श्री राम मंदिराची १२० फूट उंचीची नयनरम्य प्रतिकृती देखावा



दीड महिन्यांपासून दीडशेहून अधिक मजूर मंदिराच्या उभारणीत व्यस्त या मंदिराच्या देखाव्याच्या निर्मितीसाठी बंगालमधून विशेष कुशल कारागीर मागवण्यात आले असून, गेल्या दीड महिन्यांपासून दररोज दीडशेहून अधिक मजूर मंदिराच्या बांधकामात व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रतिकृती बनवण्यासाठी १० हजार मीटर कापड, ५ हजार बांबू आणि बल्ली, लाकडी फळ्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंचाही वापर करण्यात आला आहे. या मंदिराच्या आतील वातानुकूलित सभामंडपात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून बाहेर विशेष सजावट व स्वयंचलित रंगीत दिवे लावून विशेष सजावट करण्यात येणार आहे.



दहा दिवस विविध कार्यक्रम या पर्यावरणपूरक गणेश मंडळामध्ये गणेशोत्सवादरम्यान वृद्धाश्रमातील महिला व पुरुषांना दर्शन घेऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व औषधे देण्यात येणार आहेत. यासोबतच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये तब्बल ४ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून गणेशोत्सव काळात शहरातील ४० विविध भाषिक भजन मंडळांचे भजन कार्यक्रम गणेश मंडपात आयोजित करण्यात आले आहेत. तर गरीब,गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप, मेरिटोरियस हायस्कूल व बारावीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे गोविंदा पथक, गणेश मंडळांचा स्वाभिमान चषक व रोख पारितोषिक देऊन सत्कार केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली.



सुरक्षेचा चोख बंदोबस्त मंडळात दररोज ३५ ते ४० हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी ४०० हून अधिक सर्वभाषिक कार्यकर्ते आणि ५० विशेष सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत, तसेच ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनद्वारे संपूर्ण विभागावर नजर ठेवण्यात येणार आहे. प्रेक्षकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या प्रचारासाठी लाईव्ह फेसबुक, इंटरनेट आणि सोशल मीडियासोबतच प्रिंट मीडियाचा वापर केला जाणार आहे. या मंडळाचे उद्घाटन भिवंडी भाजपचे उपाध्यक्ष व माजी खासदार किरीट सोमय्या आणि ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आर.सी.पाटील यांच्या हस्ते होणार आहे.



म्हणून श्री राम मंदिराची प्रतिकृती निवड मंदिराचा निर्माणाधीन देखावा पाहण्यासाठी दररोज शेकडो भाविक येत असून धामणकर नाका मित्र मंडळ आणि स्वाभिमान सेवा संस्थेचे अध्यक्ष संतोष एम शेट्टी यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षात अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती निवडण्यात आली कारण, वर्षानुवर्षे राममंदिराचा वाद संपुष्टात येऊन मंदिराचे बांधकाम निर्विवाद सुरू झाले आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.

हेही वाचा Ganeshotsav 2022 अगदी कमी खर्चात घरातील गणपती सजवण्यासाठी काही टिप्स



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.