ETV Bharat / state

PM SVANIDHI Scheme ठाण्यात १८ हजार फेरीवाले कर्जाच्या रांगेत, आत्मनिर्भर निधीसाठी उद्धिष्ठापेक्षा अधिक अर्ज

author img

By

Published : Dec 13, 2022, 5:16 PM IST

Thane Corporation
ठाणे महापालिका

कोरोना लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown ) अनेक पदपथविक्रेत्यांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे या विक्रेत्यांना पुन्हा रोजगार मिळावा यासाठी 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' ( PM SAVNIDHI ) योजनेची सुरुवात करण्यात आली. ठाणे महापालिकेतही ( Thane Corporation ) या योजनेच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आले होते. ठाण्यात या योजनेच्या कर्जासाठी तब्बल १८ हजार ७६२ फेरीवाल्याचे अर्ज आले आहेत.

ठाणे - कोरोना महामारीच्या काळात (Corona Lockdown ) ठाणे शहरातील पथविक्रेत्यांच्या (Hawkers In Thane ) व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' ( PM SAVNIDHI ) योजनेची अमलबजावणी ठाणे शहारत करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या ( Thane Corporation ) समाज विकास विभागाच्या वतीने या योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले असून यासाठी शहरातील तब्बल १८ हजार ७६२ फेरीवाल्याचे अर्ज आले आहेत. आतापर्यंत १३ हजार ९७८ फेरीवाल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ८ हजार ५१० पथविक्रेत्यांना कर्ज ( Thane Corporation Provide Loan To Hawkers ) वितरित करण्यात आले आहेत. या अंतर्गत पथविक्रेत्यांना १० हजाराप्रमाणे कर्ज देण्यात येणार आहे.

ठाणे शहरात उद्धिष्ठपूर्ती - कोरोना महामारीच्या काळात (Corona Lockdown ) विपरित परिणाम झाल्यामुळे शहरी भागात रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या, व्यावसायिकांना १ वर्षाच्या कालावधीसाठी १० हजारपर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यासाठी प्रधानमंत्री पदपथ व्यावसायिक आत्मनिर्भर निधी योजनेची ( PM SAVNIDHI ) अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या एका महिन्याच्या कालावधीत ठाणे शहरात अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार ठाणे शहरात उद्धिष्ठपूर्ती झाली असून ठाण्यातील हजारो फेरीवाले आत्मनिर्भर होणार आहेत.

ठाणे महापालिका ( Thane Corporation )हद्दीत महापालिकेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र असलेले फेरीवाले यामध्ये समाविष्ट आहेत. रस्त्यावर विक्रेता अशी व्यक्ती आहे जी सामान, खाद्यपदार्थ किंवा रोजच्या वापराची विक्री करतो. रस्ता विक्रेते रस्त्यावर, गल्ली, पदपथावर, सार्वजनिक उद्यानात किंवा इतर सार्वजनिक किंवा खाजगी भागात भाड्याने देऊ शकतात, इतर ठिकाणी फिरुन व्यवसाय करू शकतात, लोकांनाही कायद्यानुसार पथ विक्रेते मानले जाते आहे.

योग्य कर्जफेड केल्यास मिळणार आणखी कर्ज - नागरी पथविक्रेते १ वर्षाच्या परतफेड मुदतीसह १० हजारापर्यंतचे बँकेमार्फत विनातारण कर्ज स्वरूपात उपलब्ध केले जाणार आहे. सदरचे कर्जावर प्रचलित दराप्रमाणे व्याज दार लागू राहणार आहे. त्याची दरमहा हप्त्याने परतफेड केल्यास ७ टक्के व्याज अनुदानाच्या लाभासाठी पात्र होणार आहेत. ज्या पथविक्रेत्याने प्रथम कर्ज १० हजार परतफेड योग्य कालावधीत केल्यास ते पथविक्रेते दुसऱ्या योजनेसाठी २० हजार आणि तिसऱ्या योजनेसाठी ५० हजार पात्र ठरणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.