Har Ghar Tiranga : सोलापुरात भारतीय तिरंग्यांसह देशविदेशातील झेंडेही बनतात; मोठ्या प्रमाणात मागणी

author img

By

Published : Aug 8, 2022, 11:58 AM IST

Updated : Aug 8, 2022, 12:58 PM IST

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा ()

सोलापुरात तयार होणारा तिरंगा झेंडा आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात विक्रीला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत जवळपास 25 लाख तिरंगा झेंडे ( tricolor flag ) विक्री केले आहेत. त्यामध्ये विविध संस्थांनी, सामाजिक संघटनांनी, शासकीय व निमशासकीय शासकीय संस्थांनी तिरंगा झेंडे विकत घेतल्याने जवळपास शंभर जणांच्या हाताला रोजगार मिळाला ( hundreds of people got employment ) आहे.

सोलापूर - केंद्र सरकारने यंदा स्वातंत्र्याचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ( Azadi Ka Amrit Mohotsav ) करा असा आदेश पारित केला आहे. हर घर तिरंगा ही संकल्पना देशात पाहिल्यांदाच राबविली जात आहे. त्यामुळे तिरंगा झेंडा उद्योगात असलेल्या व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे ( tricolor flags industry flourishing ). सोलापुरात तयार होणारा तिरंगा झेंडा ( tricolor flag ) आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यात विक्रीला गेला असल्याची माहिती सोलापूरच्या गणेश पिसे या व्यापाऱ्याने ई टीव्ही भारतशी बोलताना दिली. गेल्या दोन महिन्यांत जवळपास 25 लाख तिरंगा झेंडे विक्री केले आहेत. त्यामध्ये विविध संस्थांनी, सामाजिक संघटनांनी, शासकीय व निमशासकीय शासकीय संस्थांनी तिरंगा झेंडे विकत घेतल्याने जवळपास शंभर जणांच्या हाताला रोजगार मिळाला ( hundreds of people got employment ) आहे.

सोलापूरात तिरंगा झेंडा उद्योगाला भरभराट

हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत चार राज्यात तिरंगा - केंद्र सरकारने हर घर तिरंगा हे उपक्रम आयोजित केल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. फक्त 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या तारखाना तिरंगा झेंड्याला महत्व येते. पण यंदा या वर्षी भारतात हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga ) नारा दिल्याने प्रत्येक नागरिक आपल्या देशाचे राष्ट्रध्वज खरेदी करत आहे. सोलापुरात झेंडा उद्योगात अनेक व्यापारी काम करतात. पण यंदा या व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या राज्यातून झेंड्याची मागणी वाढली आहे. पिसे झेंडेवाले व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या भागात झेंडा विकले असल्याची माहिती दिली.

दोन महिन्यांपासून झेंडा उद्योगात भरपूर रोजगार - तिरंगा झेंडा खरेदी करण्यासाठी ग्राहक वाढल्याने सोलापुरातील तिरंगा झेंडे व्यावसायिक यांनी देखील कामाचा व्याप वाढविला आहे. आपल्या दुकानात आणि कारखान्यात कामगारांची संख्या वाढवली आहे. गणेश पिसे या झेंडा व्यवसायिका कडे जवळपास शंभर महिला काम करत आहेत. शहरातील प्रत्येक दुकानात ग्राहक तिरंगा झेंड्याची मागणी करत असल्यानें दुकानदारांनी आपल्या दुकानातील कामगारांची संख्या देखील वाढवली आहे. अतिशय अल्प दरात म्हणजेच 10 रू,20रु, आणि 30 रुपयांपासून तिरंगा झेंडे उपलब्ध आहे.

हेही वाचा - Suspense on BJP JDU alliance in Bihar : बिहारची अवस्था महाराष्ट्रासारखी? नितीश यांनी बोलावली बैठक

Last Updated :Aug 8, 2022, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.