ETV Bharat / state

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीकडून कान्होपात्राच्या झाडाला मिळणार नवसंजीवनी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार वृक्षारोपण

author img

By

Published : Jul 7, 2021, 3:21 PM IST

Updated : Jul 7, 2021, 4:58 PM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेचा एक भाग म्हणून संत कान्होपात्रा यांच्या झाडांची म्हणून माहिती देताना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारीओळख आहे. कान्होपात्र झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. या झाडाला नव्याने संजीवनी देण्याचा निर्णयही विठ्ठल मंदिर समितीने घेतल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. आषाढी एकादशी सोहळा दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी हजारो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेचा एक भाग म्हणून संत कान्होपात्रा यांच्या झाडांची म्हणून ओळख आहे. कान्होपात्र झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. मात्र, हे झाड शंभर वर्षे जुने झाले आहे. त्यामुळे कान्होपात्रा झाडाला नव्याने संजीवनी देण्याचा निर्णयही विठ्ठल मंदिर समितीने घेतल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. आषाढी एकादशी सोहळा दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे.

माहिती देताना मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी

कोण आहेत संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा या विठ्ठलाच्या भक्त होत्या. संत कान्होपात्रा यांचा जन्म 15 व्या दशकात झाला असल्याची नोंद आहे. कान्होपात्रा एका गानिकेची मुलगी होती. संत कान्होपात्रा ही मराठी साहित्यातली कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. संत कान्होपात्रा यांच्या ओवी व अभंग आजही वारकरी संप्रदायामध्ये म्हणाल्या जातात. संत कान्होपात्रा या विठ्ठलाच्या भक्त होत्या. बिदर येथील बादशहाच्या तावडीतून सुटण्यासाठी संत कान्होपात्रा हा विठ्ठलाच्या चरणी आल्या होत्या. त्यांची विठ्ठलाच्या बाजीराव पडसाळी येथे समाधी घेतली होती.

संत कान्होपात्राचे शंभर वर्षापूर्वीचे जुने झाड

पंढरपूरला राज्याची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. विठ्ठलाचे अध्यात्मिकदृष्ट्या मोठे स्थान आहे. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. या परंपरेचा एक भाग म्हणून वारकरी संप्रदायमध्ये संत कान्होपात्रा यांना विशेष स्थान आहे. संत कान्होपात्रा यांनी विठ्ठलाच्या प्रेमाखातीर मंदिरातील बाजीराव पडसाळी येथे समाधी घेतल्याची आख्यायिका आहे. या समाधी जवळच शंभर वर्षांपूर्वीचे तुरटीचे झाड उगवले होते. हे झाड कान्होपात्रा या नावाने प्रसिद्ध आहे. मात्र, 100 वर्षांचे हे जुने झाड काळानुसार सडून व सुकून गेले आहेत. आता संत कान्होपात्रा झाड हे फक्त खोड असे दिसून येते. त्यामुळे विठ्ठल मंदिर समितीकडून या झाडाला संजीवनी देण्यासाठी नव्याने लावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार कान्होपात्रा झाडाचे वृक्षारोपण

पांडुरंगाच्या आषाढी वारीसाठी लाखो भक्त पंढरपुरात येत असतात. विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन मंडपातून बाजीराव पडसाळीकडे भाविक आल्यानंतर कान्होपात्रा झाडाचे दर्शन घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे झाड पूर्णपणे सुकून गेले आहे. त्यामुळे वारकरी भाविकांची श्रद्धा लक्षात घेता, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून संत कान्होपात्रा वृक्षाचे संवर्धन करण्यात येणार आहे. कान्होपात्रा नावाचे वृक्ष येत्या आषाढी एकादशी दिवशी लावण्यात येणार आहे. संत कान्होपात्रा यांचे हे झाड जुन्या पिंपळ झाडाच्या जागेवर लावण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला. संत कान्होपात्रा वृक्षारोपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हेही वाचा - पंढरपुरमध्ये 17 जुलै ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी असणार, योगिनी एकादशी निमित्ताने भाविकांची गर्दी

Last Updated :Jul 7, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.