ETV Bharat / state

मुलीने मागितला जमीनीत वाटा,आईनेच काढला मुलीचा काटा

author img

By

Published : Jun 11, 2021, 6:07 PM IST

गेल्या काही दिवसांपासून मुलगी व आईचा जमिनीच्या कारणावरून वाद होत होता. मुलगी जमिनीचा हिस्सा मागत असल्यामुळे झोपेत असताना डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची कबुली चंदाबाई नारळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे जमिनीच्या वादातून आईने पोटच्या लेकीचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

मंगळवेढा शहरात मंगळवारी खून
मंगळवेढा शहरात मंगळवारी खून

पंढरपूर (सोलापूर)- जमिनीचा हिस्सा मागितल्यामुळे एका आईने पोटच्या मुलीचा दगडाने ठेचून खून केला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात मंगळवारी ही घटना घडली आहे. जमिनीच्या वादातून आईनेच पोटच्या मुलीचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा बनाव केला होता. मंगळवेढा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि आईनेच लेकीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चंदाबाई कुबेर नारळे (वय 55) हिला अवघ्या सहा तासात गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी अटक केली आहे.

आईने लेकीच्या खुनाचा केला होता बनाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी शहरातील अकोला रोड येथे, चंदाबाई कुबेर नारळे या आपल्या मुलीसह राहत होत्या. चंदाबाई नारळे यांच्या पतीचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर मुलगी मंगल कुबेर नारळे वय (वय 35) या चंदाबाई नारळे यांच्यासोबत राहण्यास आल्या होत्या. मात्र 9 जून रोजी आई व मुलगी घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या. मध्यरात्री आईच्या पोटात कळ आली म्हणून आई शौचालयास गेली असता. अज्ञात मारेकर्‍यांनी मुलीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, मुलीच्या खुनाचा बनाव उघडकीस आला.

जमिनीच्या वादातून आईनेच घेतला लेकीचा बळी
चंदाबाई नारळे यांनी मुलीचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून खून केल्याची तक्रार पोलिसात दिली. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत, आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आईची चौकशी करत असताना सर्व प्रकार पोलिसांनी उघडीस आणला. गेल्या काही दिवसांपासून मुलीचे व आईचे जमिनीच्या कारणावरून वाद होत होते. मुलगी जमिनीचा हिस्सा मागत असल्यामुळे मुलगी झोपेत असताना, डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली चंदाबाई नारळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे जमिनीच्या वादातून आईने पोटच्या लेकीचा खून केल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मंगळवेढा विभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

हेही वाचा- अहमदनगर : अजोबाच्या मदतीने वडिलांचा खून, दोघेही अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.