ETV Bharat / state

Sushilkumar Shinde : प्रणिती शिंदेंच्या तिकिटासाठी हायकमांडकडं विनंती करणार; सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 2:21 PM IST

Praniti Sushilkumar Shinde
सुशीलकुमार शिंदेचे वक्तव्य

माहिती देताना सुशीलकुमार शिंदे

Sushilkumar Shinde : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलंय. आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीला सुशीलकुमार शिंदे यांनी पसंती (Sushilkumar Shinde on lok Sabha Election) दिली आहे. तर प्रणिती शिंदे आता राष्ट्रीय राजकारणात दिसतील असे संकेतही मिळत आहेत. सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत.

सोलापूर : Sushilkumar Shinde : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी सोलापुरातील एका कार्यक्रमादरम्यान लोकसभा निवडणुकीवर (lok Sabha Election 2024) भाष्य केलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हायकमांडकडं प्रणिती शिंदेंना तिकीट मिळावं अशी विनंती करणार (Sushilkumar Shinde on lok Sabha Election) असल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी (Sushilkumar Shinde) सांगितलं. राष्ट्रीय पातळीवर असलेल्या आणि देशाच्या माजी गृहमंत्री पदावर राहून देशाचे राजकारण पाहणाऱ्या सुशीलकुमार शिंदेंना आपल्याच मुलीसाठी हायकमांडकडे विनंती करण्याची वेळ आली आहे.

सोलापूर मतदार संघात भाजपचा बोलबाला : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तर्फे आमदार प्रणिती शिंदें यांच्या नावाची शिफारस काँग्रेस कमिटीने केली आहे. तीन दशके सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे खासदार होता. मात्र दोन वेळा भाजपच्या नवख्या उमेदवारांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच दारुण पराभव केला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कडून प्रणिती शिंदेंच्या नावाची चर्चा असताना, सुशीलकुमार शिंदेंनी देखील प्रणिती शिंदें या लोकसभेच्या उमेदवार असतील अशी माहिती दिली. तशी विनंती देखील हायकमांडकडे करणार असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलय.




मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न : सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापुरात काँग्रेस कमिटी विविध कार्यक्रम राबवत आहे. काँग्रेस कमिटी मधील अल्पसंख्याक सेलने शनिवारी सायंकाळी सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या खाजगी व सरकारी शाळांमधील मुस्लिम शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देत त्यांचा गौरव केला.यावेळी हजारो मुस्लिम बांधव कार्यक्रमासाठी आले होते.शनिवारी सायंकाळी मौलाली चौक येथील इंपीरियल हॉलमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 151 मुस्लिम शिक्षकांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वास्तव्यास असलेल्या मुस्लिम समाजातील मतदान आकर्षित करण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न असल्याचे दिसून आला. काँग्रेस अल्पसंख्याक सेल मधील रियाज हुंडेकरी, शौकत पठाण, फिरदोस पटेल, असिफ इकबाल आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

विनंती करणार असल्याची दुर्दैवी वेळ का आली? : सुशीलकुमार शिंदे हे अनेक वर्षे खासदार होते. राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री, केंद्रीय गृहमंत्री आदी पदावर राहून त्यांनी देशाचं कामकाज पाहिलं आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देखील सुशीलकुमार शिंदे हे रेस मध्ये होते. पण ऐनवेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची वर्णी लागल्याने सोलापुरातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये काँग्रेसभवन मध्ये नाराजी व्यक्त करत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षकांचा निषेध केला होता. काही प्रमाणात तोडफोड देखील केली होती. ही बाब ज्यावेळी हायकमांडला माहिती झाली त्यावेळी सोलापुरातील काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांना माफी मागावी लागली होती. तसेच 2019 मध्ये महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या नावाची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार होती. पण ऐनवेळी प्रणिती शिंदेंच्या नावाऐवजी वर्षा गायकवाड यांना संधी देण्यात आली. ही सर्व कारणं समोर आल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात 2024 च्या निवडणुकीत प्रणिती शिंदेंना तिकीट मिळतय की नाही? अशी परिस्थिती आहे. तर प्रणिती शिंदेंसाठी विनंती करण्याची दुर्दैवी वेळ सुशीलकुमार शिंदेवर आली आहे.



हेही वाचा -

  1. Praniti Shinde Loksabha : काँग्रेसचा मोठा निर्णय! सोलापूर लोकसभेची उमेदवारी प्रणिती शिंदे यांनाच द्यावी
  2. Solapur News: राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; प्रणिती शिंदे यांची भाजपवर सडकून टीका
  3. Solapur News: केसीआर यांना सोलापुरी 'शिक कबाब' खाऊ घालू, सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.