ETV Bharat / state

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीत फुला-फळांची आरास

author img

By

Published : Nov 18, 2020, 8:12 PM IST

Updated : Nov 18, 2020, 10:40 PM IST

पंढरपूरचे श्री.विठ्ठल व रुक्मिणीमातेचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यानिमीत्त आज श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात मनमोहक अशी रंगीबेरंगी फुलाची व फळाची आरास करण्यात आली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीत फुलांची फळांची आरास
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीत फुलांची फळांची आरास

पंढरपूर - दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने राज्यातील मंदिरे दर्शनासासाठी खुली केली. त्यानंतर वारकऱ्यांचा आराध्य दैवत असलेले पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर गाभारा, सोळखांबी सभामंडप, नामदेव पायरी, या ठिकाणी आकर्षक अशी रंगबेरंगी फुलांची आणि फळांची आरास करण्यात आली आहे. आजची सजावट पुण्याचे भाविक भारत भुजबळ यांच्याकडून करण्यात आली आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीत फुला-फळांची आरास

फुलांबरोबर फळांची आरास -

विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यात जरबेरा, झेंडूंच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्याचबरोबर गाभार्‍यासह मंदिरातही आकर्षक फुलांसह फळांनी सजावट करण्यात आले आहे. या सजावटीने गाभारा व मंदिराचे रूप मनमोहक दिसत होते. फुलांबरोबर फळांची आरास विठ्ठल व रुक्मिणी मातेला यावेळी करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने सफरचंद, संत्री अशा फळांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेचा गाभारा मनमोहक रूपांनी सजला होता, विठ्ठल व रुक्मिणी मातेला विविध अलंकारांनी सजवण्यात आली होते.

भक्तांमधून समाधान -

ऑनलाईन बुकिंग करून भाविकांना विठ्ठल-रुक्मिणी मातेचे हे रूप भाविकांना याची देही याची डोळा पाहण्यास मिळाली, त्यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुंदर आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. यावेळी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांनी केली आहे.

Last Updated : Nov 18, 2020, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.