ETV Bharat / state

World Disability Day - अपंगत्वावर मात करत जीवन संघर्षात ठरल्या विजयी, पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

author img

By

Published : Dec 3, 2021, 7:36 AM IST

बऱ्याचदा हेलन केलर यांनी अपंगत्वावर मात केलेली कहाणी सांगितली जाते. त्यांचा १८८० साली जन्म झाला. त्यांच्यावर मेंदूज्वरामुळे बालपणीच मूक-बधिरत्व आणि अंधत्व हे दोन ओढावले होते. मात्र त्यांनी या संकटांवर मात करत कालांतराने प्राध्यापिका, लेखिका आणि समाजसेविका म्हणून जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. (World Disability Day) अशीच उर्जा असलेल्या आणि आपल्या हिंमतीवर अपंगत्वावर मात केलेल्या ग्रामीण भागातही कित्येक स्त्रीया आहेत. अशा काही स्त्रीयांबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.

World Disability Day - अपंगत्वावर मात करत जीवन संघर्षात विजयी ठरलेल्या महिलांची विशेष बातमी
World Disability Day - अपंगत्वावर मात करत जीवन संघर्षात विजयी ठरलेल्या महिलांची विशेष बातमी

सोलापूर - जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. सन 1992 पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला जातो. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. सोलापुरात जवळपास 2 हजार अपंग व्यक्तींची नोंद आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सेतू कार्यालयात रायटरचे काम करणारे अपंग व्यक्ती सहसा दिसून येतात. या सर्वांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.

माहिती देताना महिला

अपंग व्यक्तींना पाहून जगण्याची धडपड दिसून येते (World Disability Day)

उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, सातबारा उतारा आदी लेखी कामे करून आपली उपजीविका भागवत असतात. सेतू कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढावयाचे असतात. आलेल्या नागरिकांना सेतू कार्यालयातील कामकाजाबाबत अधिक माहिती नसते, त्यावेळी या अपंग व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत अनेक नागरीक आपली कामे करून जातात. जाता-जाता यांना मोठ्या आदराने निरोप घेतात. (Disability) सोलापूर सेतू कार्यालयात अपंग व्यक्तींना पाहून जगण्याची धडपड दिसून येते. कोणताही न्यूनगंड न बाळगता ही अपंग नागरिक सोलापुरात वावरताना दिसतात.

World Disability Day - अपंगत्वावर मात करत जीवन संघर्षावर विजयी
World Disability Day - अपंगत्वावर मात करत जीवन संघर्षावर विजयी

अपंग असल्याने आंतरजातीय विवाह करावा लागला (World Disability Day)

वासंती होनमुंबडे यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला. जन्मजात अपंग असल्याने म्हणावा तसा सन्मान यांना मिळाला नव्हता. घरात अठरा विश्व दारिद्र्य होते. आई वडलांचा मृत्यू झाल्यानंतर सांभाळ करण्यासाठी कोणी नव्हते. कसेबसे आयुष्य काढले. वयात आल्यावर कोणी लग्नसुद्धा करून घेत नव्हते. अखेर वासंती यांनी एका हिंदू अपंग व्यक्तीसोबत लग्न करून आता त्या सुखी आयुष्य जगत आहेत. दोघे पती पत्नी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सेतू कार्यालयात एजंटचे काम करून जीवन जगत आहेत. या दाम्पत्याला दोन मुलं देखील आहेत.

अपंग असल्याचा अभिमान- (World Disability Day)

आशा चौरे या पायाने 76 टक्के अपंग आहेत. लहानपणी पोलियो झाल्याने दोन्ही पाय निकामी झाले. आई वडिलांनी धीर देत आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवला. अपंग असल्याची जाणीव देखील करू दिली नाही. तसेच, अपंगत्व नसलेल्या व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी आशा चौरे नेहमी धडपड करत असतात. ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी सांगितले की, (Disability) अपंग आहे, याचा थोडदेखील न्यूनगंड बाळगलं नाही. उलट स्वतः कष्ट करून काही तरी कमवण्याची संधी मिळाली, आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात विविध दाखले बनवून देण्याचे कार्य करत असल्याची माहिती दिली. तसेच, आपण अपंग असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असही आशा चौरे यांनी यावेळी सांगितले आहे. (Inspirational story of a disabled person)

हेही वाचा - Omicron New Variant : देशाबाहेरून २८६८ प्रवासी मुंबईत दाखल, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.