ETV Bharat / state

Amol Mitkari Criticizes AIMIM : एमआयएम ही आरएसएसची शाखा -अमोल मिटकरी

author img

By

Published : Dec 15, 2021, 7:54 AM IST

एमआयएम ही आरएसएसची शाखा -अमोल मिटकरी
एमआयएम ही आरएसएसची शाखा -अमोल मिटकरी

एमआयएम या पक्षाला भारताताली सामान्य मुस्लीम चांगला ओळखून आहे. त्यामुळे तो या पक्षाच्या मागे जात नाही. (Amol Mitkari Criticizes AIMIM) तेसच, हा पक्ष आरएसएसची शाखा आहे असा आरोपही राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सोलापूर - एमआयएम हा पक्ष आरएसएसची शाखा आहे. तसेच, देशातला सामान्य मुस्लीम एमआयएमला चांगला ओळखतो त्यामुळे तो असा कुणाही मागे जाणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली आहे. तसेच, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या जागा विजयी झाल्या आहेत. (Amol Mitkari criticizes BJP) त्यावर बोलताना मिटकरी यांनी भाजपने पैसे वाटून मत विकत घेतल्याचा आरोप केला आहे. जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने सोलापुरात पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. (MLC Election Results 2021) त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (AIMIM MLC Election) मुस्लिम आरक्षण आणि आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एमआयएम पक्ष वेगळ्या प्रकारचे ध्येयधोरणे आखत आहे. त्यावरून एमआयएम पक्षावर निशाण साधला आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार मिटकरी

भाजपने पैशाचा वापर करून अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या जागा जिंकल्या-

नागपूर आणि अकोला येथे झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पैशाचा प्रचंड वापर केला. त्यामुळे त्यांचा विजय झाला आहे असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना केले. विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. अकोला येथून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा 110 मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना 331 तर, भाजपचे उमेदवार खंडेलवाल याना 441 मते मिळाली आहेत.

एमआयएम आरआरएसची शाखा

आगामी काळात राज्यात विविध शहरात महानगरपालिका निवडणुका होणार आहे. त्यामुळे त्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा समोर करून एमआयएम पक्षाने राजकिय खेळी सुरू केल्या आहेत. एमआयएम खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी तर असे जाहीर केले आहे की, मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim reservation on AIMIM) मिळाले तर एमआयएम महानगरपालिकेच्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार देणार नाही. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ही भाजपाची खेळी आहे. एमआयएम हा पक्ष आरआरएसची एक शाखा आहे, असा आरोपही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला

विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख यांना 186 मते मिळाली आहेत. तर, छोटू भोयर यांना फक्त 1 मत मिळाल्याचे समोर आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 278 मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत.

नागपूरच्या जागेवर भाजपने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना संधी दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी आपल्या स्तरावर काम केले होते. बावनकुळे यांना 362 मते मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवाराला 186 मत मिळाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीची मते फुटल्याचे समोर आले आहे.

अकोल्यातही भाजपचा विजय

अकोल्यातून भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा 110 मतांनी विजय झाला आहे. सेनेचे बाजोरिया यांना 331 तर भाजपचे उमेदवार खंडेलवाल याना 441 मते मिळाली आहेत.

अकोला विधान परिषद - मिळालेली मते

भाजप - 443

सेना - 334

वैध - 777

बाद - 31

हेही वाचा - Rupali Patil Thombare Resigned : राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच रूपाली पाटील यांचा राजीनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.