ETV Bharat / state

Mangalwedha Two Sister Death : दुर्दैवी ! मंगळवेढ्यात अन्नातून विषबाधा झाल्याने सख्ख्या बहिणींचा मृत्यू

author img

By

Published : Dec 24, 2021, 8:28 PM IST

दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यात अन्नातून विषबाधा ( Mangalwedha Food Poisoning ) झाल्याने दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. तर मुलींच्या आई-वडीलांवर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा पोलिस ( Mangalwedha Police Station ) करत आहे.

पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यात अन्नातून विषबाधा ( Mangalwedha Food Poisoning ) झाल्यामुळे सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर विषबाधेमुळे आई-वडीलांवर उपचार सुरू आहेत. भक्ती आबासाहेब चव्हाण ( वय, 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण ( वय, 4) अशी या मृत्यू झालेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ( Mangalwedha Police Station ) पुढील तपास करत आहेत.

आबासाहेब चव्हाण हे पत्नी व दोन मुलींसह मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ( Mangalwedha Taluka Marwade ) येथे राहतात. त्यांनी मंगळवेढा शहरातील दुकानातून लहान मुलासाठी खाण्यासाठी खाऊ आणला होता. हा खाऊ कुटुंबातील सर्वांनी खाल्ला होता. त्यानंतर अचानकपणे कुटुंबातील प्रत्येकाला अस्वस्थ वाटू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, मंगळवेढ्यातून पुढील उपचारासाठी आबासाहेब चव्हाण यांच्यासह पत्नी व दोन मुलींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केले होते. मात्र, उपचारावेळी पहाटेच्या सुमारास भक्ती व नम्रता यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पुढील तपास मंगळवेढा पोलीस करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.