ETV Bharat / state

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीसंदर्भात शरद पवारांची मोठी भविष्यवाणी; भाजपचे टेन्शन वाढणार

author img

By

Published : May 7, 2023, 8:16 PM IST

Updated : May 7, 2023, 8:24 PM IST

शरद पवार यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला आहे. यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांची एकजूट होण्याची शक्यता आहे. दरम्यान लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी भाजपची चिंता वाढवणारी भविष्यवाणी केली आहे.

Sharad Pawar's prediction
शरद पवारांची भविष्यवाणी

सोलापूर : कर्नाटक राज्यात विधानसभेसाठी १० मेला मतदान होणार असून १३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या राज्याची विधानसभा आपल्याकडे राहावी, यासाठी भाजपने जोरात दंड थोपटले आहेत. तर कर्नाटकात परत एकदा पंजाची ताकद दिसावी म्हणून काँग्रेसनेही मोठी टक्कर दिली आहे. निवडणुकीचा प्रचार अजून चालू आहे. याचदरम्यान राजकारणातील चाणक्य म्हणजेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर विजयाचा गुलाल उधळला आहे.

तीन दिवसांनी परत घेतला राजीनामा: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची एकजूट करण्याचा विचार शरद पवार यांनी केला आहे. परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे विरोध एकजूट होण्याच्या प्रयत्नावर पाणी फिरणार होते. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील नेतेदेखील राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती करत होते. राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी तीन दिवसाता राजीनामा मागे घेतला.

भाजपची चिंता वाढली : शरद पवार यांनी नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला आहे. यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांची एकजूट होण्याची शक्यता आहे. दरम्यान लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी भाजपची चिंता वाढवणारी भविष्यवाणी केली आहे.

भाजपा नेत्यांनी देव पाण्यात ठेवले : शरद पवार यांनी राजीनामा परत घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी राजीनामा मागे घेऊ नये. पक्षाच्या उच्चस्तरीय समितीने त्यांचा राजीनामा स्वीकारावा, यासाठी काहींनी देव पाण्यात ठेवले होते. याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असताना शरद पवार म्हणाले, हे भाजपाच्या नेत्यांशिवाय दुसरे कोण असेल. त्यांना मी राजीनामा द्यावा असे वाटतं.

कर्नाटकात काँग्रेस येणार सत्तेत : दरम्यान, राजकारणात ज्यांना चाणक्य म्हटले जाते त्यांनी म्हणजेच शरद पवार यांनी कर्नाटकात भाजपचे पानीपत होणार असल्याचे भाकित केले आहे. कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार असल्याची भविष्यवाणी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे केली. पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपची सत्ता फक्त पाच ते सहा राज्यात आहे. तर उर्वरीत राज्यात इतर पक्षांची सत्ता आहे. माझ्या सूत्रांनुसार, कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार आहे.

मोजक्याच राज्यात भाजपची सत्ता : देशातून भाजपला बाहेर काढण्याच्या त्यादृष्टीकोनातून विचार केला तर आपण केरळपासून सुरू करू. भाजपा केरळमध्ये आहे का? तमिळनडूमध्ये आहे का? मी फक्त तुम्हाला कर्नाटकाविषयी सांगतिले. भाजप तेलंगणात आहे का? आंध्र? महाष्ट्रातील सत्तेत ते आहेत तेपण एकनाथ शिंदेच्या स्मार्टखेळीमुळे. तर मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री असताना भाजपने काही आमदारांना आपल्या जाळ्यात ओढलं त्यानंतर सत्ता मिळवली. त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं तर राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, आणि बंगालमध्ये भाजप सत्तेत नाही. देशाचा नकाशा आपण पाहिला तर त्यातील केवळ पाच ते सहा राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. तर इतर उर्वरित राज्यांमध्ये भाजपेत्तर सरकार असल्याचं शरद पवार म्हणाले. दरम्यान आत्ताच्या परिस्थितीवरुन पुढच्या वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत काय होईल, हे सांगता येणार नसल्याचेही ते म्हणाले.

शेती आणि मासेमारीवर परिणाम : पत्रकारांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीविषयी शरद पवार यांना प्रश्न केला असता पवार म्हणाले की, तेथील ग्रामस्थ रिफायनरीला विरोध करत आहेत. सरकारने नागरिकांच्या असंतोषाकडे दुर्लक्ष करू नये. त्यांचे हित जपावे. या प्रकल्पाचा तेथील शेती आणि मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.

लोकांना विश्वासात घ्या: आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर करणे योग्य नसल्याचेही ते म्हणाले. प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला होता. प्रकल्पाचे काम पुढे नेण्याआधी तेथील लोकांना विश्वासात घेतले पाहिजे.

विरोधी पक्षांची एकमुठ बांधणार : पुढील लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (उबाटा), राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसतील का? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुका जर ठाराविक वेळेआधी होणार असतील तर ते तिन्ही पक्ष जागा वाटपावर चर्चा करतील. राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची ऐक्य राहावे अशी अनेकांची इच्छा आहे. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काही राज्यांचा दौरा केला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र यावे हा विचार घेऊन पुढे कसे जाता येईल आणि निवडणुकीच्या माध्यमातून देशात परिवर्तन कसे घडवून आणता येईल, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असल्याचे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा -

Last Updated :May 7, 2023, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.