ETV Bharat / state

लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या आजोबासह नातवावर काळाचा घाला

author img

By

Published : Feb 3, 2020, 10:04 AM IST

पिकअप गाडी आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील नातू आणि आजोबाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात अभिजीत रमेश मोरे (वय 22 रा. कन्हेरगाव ता. माढा), महादेव नामदेव डांगे (वय 70 रा. पिंपळनेर ता. माढा) मृत्यू झाला आहे.

solapur
लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या आजोबा आणि नातवावर काळाचा घाला

सोलापूर - मोठ्या भावाच्या लग्नाची पत्रिका वाटून दुचाकीवरून परतणाऱ्या नातू आणि आजोबा यांना पिकअप गाडीने समोरासमोर धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नातू आणि आजोबा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सांयकाळच्या सुमारास कुर्डू गावाच्या हद्दीत घडली. अभिजीत रमेश मोरे (वय 22 रा. कन्हेरगाव ता. माढा), महादेव नामदेव डांगे (वय 70 रा. पिंपळनेर ता. माढा), असे मृत नातू आणि आजोबाचे नाव आहे.

लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या आजोबा आणि नातवावर काळाचा घाला

हेही वाचा - कार - टँकरचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

अभिजीत मोरे हा माढा तालुक्यातील बारलोणी येथील नातेवाईकांना आपल्या भावाच्या लग्नाची पत्रिका वाटून कन्हेरगावकडे परतत होता. यावेळी कुर्डू गावाच्या हद्दीत समोरून भरधाव येणाऱ्या पिकअपने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीवरील आजोबासह नातवाला जोरदार मार लागला. यामध्ये ते दोघेही ठार झाले.

हेही वाचा - पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न

कन्हेरगाव येथील रमेश मोरे यांचा मुलगा किशोरचा 14 फेब्रुवारीला विवाह असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. कुटुंबीयाचा भार कमी करण्यासाठी किशोरचा भाऊ अभिजीतने नातेवाईकांना पत्रिका वाटण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार अभिजीत त्याच्या आईचे वडील महादेव डांगे यांना आपल्यासोबत घेऊन गेला होता.

हेही वाचा - पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न

बारलोणी येथील नातेवाईकांना पत्रिका वाटून माघारी परतत असताना अभिजीतच्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या पिकअपने (एम.एच 24 ए.बी. 6325) अभिजितच्या दुचाकीला (एम.एच. 45 डब्ल्यु 9943) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील अभिजीत आणि आजोबाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Intro:mh_sol_01_accident_7201168

लग्नपत्रिका वाटून परतणाऱ्या आजोबा आणि नातू अपघातात ठार,
कुर्डु गावाजवळ पिक अपने दुचाकीला उडविले

सोलापूर-

मोठ्या भावाच्या लग्नाची पत्रिका वाटुन घराकडे माघारी चाललेल्या दुचाकी व पिक अप मध्ये समोरा समोर झालेल्या भिषण अपघातात नातु व आजोबा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सांयकाळीच्या सुमारास कुर्डू गावच्या हद्दीत घडलीय.Body:अभिजीत रमेश मोरे(वय २२ रा.कन्हेरगाव ता.माढा),महादेव नामदेव डांगे (वय७० रा.पिंपळनेर ता.माढा) असे अपघातात जागीच ठार
झालेल्याचे नाव आहे.
मृत रमेश मोरे हे आपल्या भावाची लग्नाची पत्रिका बारलोणी ता.माढा येथील पाव्हुण्यांना वाटुन माघारी मुळगावी कन्हेरगाव ता.माढा गावाकडे जात असताना कुर्डू गावच्या हद्दीत समोरुन भरधाव येणार्या पिक अप व दुचाकीची समोर समोर धडक बसली यात दुचाकीवरील आजोबासह नातवाला जबर मार लागला यात ते दोघेही ठार झाले.
कन्हेरगाव येथील रमेश मोरे यांचा मुलगा किशोरचा १४ फेब्रुवारी ला विवाह असल्याने घरात लगिन घाई सुरु होती.कुटंबियाचा भार कमी करण्यासाठी किशोरचा भाऊ अभिजीत ने नातेवाईकांना पत्रिका वाटण्याचे काम हाती घेतले होते.त्यानुसार अभिजीत व त्यांच्या आई कडील आजोबा महादेव डांगे यांना घेऊन बारलोणी ता.माढा येथील नातेवाईकांना पत्रिका वाटुन माघारी परतत असताना अभिजीत च्या दुचाकीला समोरुन भरधाव आलेल्या पिक अप(क्र एम.एच २४ ए.बी.६३२५) ने मोरे याच्या हिरो कंपनीच्या फॅशन प्रो दुचाकी ला(क्र एम.एच.४५ डब्ल्यु ९९४३) जोराची धडक बसली यात दुचाकीवरील नातु व आजोबाचा जागीच मृत्यू झाला.पिक अप चालकाने मात्र या ठिकाणाहुन धुम ठोकली.लग्न कार्यात असा दुःखाचा डोंगर कोसळल्याने गाव शोकसागरात बुडाले आहे.
घटना समाजताच कुर्डूवाडी रुग्णवाहिकेचे चालक बालाजी कोळेकर यांनी घटना स्थळी जाऊन दोघांना रुग्णालयात आणले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.