पोलिस कॉन्स्टेबलचा हूबेहूब ड्रेस शिवून व्हिडीओ कॉल करत चौघा तरुणांना अडीच लाखांनी फसविले; अक्कलकोट तालुक्यातील घटना

author img

By

Published : Sep 3, 2022, 4:23 PM IST

तोतया पोलीस कॉन्स्टेबल

वळसंग पोलीस ठाण्याच्या Walsang Police Station हद्दीतील हालचिंचोळी ( ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) येथील चौघांना एका तोतया पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस भरती करत Police recruitment lure by fake police Akkalkot असे सांगत 2 लाख 40 हजार फसविले आहे. आरोपी पोपट चौघुले याने पोलिसांसारखा युनिफॉर्म देखील शिवला होता आणि पोलीस युनिफॉर्ममध्ये व्हाट्सअप कॉल करून पैसे उकळत looted money by making fake whatsapp calls Solapur होता.

सोलापूर- वळसंग पोलीस ठाण्याच्या Walsang Police Station हद्दीतील हालचिंचोळी ( ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) येथील चौघांना एका तोतया पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस भरती करत Police recruitment lure by fake police Akkalkot असे सांगत 2 लाख 40 हजार फसविले आहे. पोपट रामचंद्र चौघुले (वय 32 वर्ष, रा भाळवणी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या तोतया पोलिसाला वळसंग पोलिसांनी अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. विशेष म्हणजे, संशयित आरोपी पोपट चौघुले याने पोलिसांसारखा युनिफॉर्म देखील शिवला होता आणि पोलीस युनिफॉर्ममध्ये व्हाट्सअप कॉल करून पैसे उकळत looted money by making fake whatsapp calls Solapur होता. याबाबत मलकासिद्ध रमेश जमादार (वय 28, रा. हालचिंचोळी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे. वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हळप्पा सुरवसे यांनी अधिकृत माहिती दिली.

युनिफॉर्मवरील डीपी ठेवत चौघांकडून अडीच लाख उकळले- तोतया पोलीस कॉन्स्टेबल पोपट रामचंद्र चौघुले याने एका टेलरकडून खाकी शर्ट खाकी पॅन्ट,पोलीस बॅच लावलेलं पोलीस कॉन्स्टेबलच हुबेहूब ड्रेस शिवून घेतला. व्हाट्सअपवर डीपी देखील पोलीस युनिफॉर्म मधील ठेवला होता. यावरून तो पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या चौघांना व्हिडीओ कॉल करत होता.


पोलीस भरती करतो, अशी थाप मारली- हालचिंचोळी (ता अक्कलकोट )येथील तरुणांशी संपर्क करत त्याने पोलीस भरतीचे आश्वासन दिले होते.10 मे पासून तोतया पोलीस चार तरुणांना व्हिडीओ कॉल करत पैशांची मागणी करत होता. मलकारसिद्ध रमेश जमादार,रवी गेनसिद्ध जमादार,समर्थ अशोक भगत,आकाश चंद्रकांत कोळी हे चौघे तरुण पोलीस भरतीच्या आमिषाला बळी पडून तोतया पोलीस पोपट चौघुलेस प्रत्येकी 60 हजार रुपये रक्कम दिली होती. 10 मे पासून 1 सप्टेंबर पर्यंत एकूण 2 लाख 40 हजार रुपये रक्कम दिली होती.


चौघा तरुणांनी तक्रार दिली- तोतया पोलीस पोपट चौघुले हा चौघा तरुणांना नेहमी पोलीस युनिफॉर्ममध्ये व्हिडीओ कॉल करत होता. पोलीस आपल्या सोबत बोलत आहे, असा विश्वास करून चौघा तरुणांनी तोतया पोलिसाला रोख रक्कम दिली होती. ज्यावेळी या चार तरुणांना तो तोतया पोलीस आहे, याची माहिती प्राप्त होताच पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या चौघा तरुणांनी वळसंग पोलीस ठाण्यात येऊन 1 सप्टेंबर रोजी रीतसर फिर्याद दिली व गुन्हा दाखल केला.


गुन्हा दाखल होताच तो तोतया पोलीस फरार- तोतया पोलिसाला आपले बिंग फुटल्याचे माहिती होताच तो राहत्या घरातून फरार झाला. वळसंग पोलिसांनी आपल्या खबऱ्यामार्फत त्याचा ठावठिकाणा लावत पोपट चौगुले या तोतया पोलीस कॉन्स्टेबलला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज या गावातून अटक केले आहे. तसेच त्याच्या जवळ असलेला पोलीस युनिफॉर्म देखील जप्त केला आहे. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. याचा अधिक तपास वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय अतुल भोसले, पीएसआय म्हळप्पा सुरवसे करत आहेत.

हेही वाचा Landslide Mumbra Thane मुंब्य्रात दरड कोसळून महिलेचा मृत्यू; परिसरातील १४ कुटुंबीयांना इतरत्र हलवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.