ETV Bharat / state

विठ्ठल मंदिर समितीकडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप

author img

By

Published : May 16, 2021, 10:56 AM IST

विठ्ठल मंदिर समिती कडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप
विठ्ठल मंदिर समिती कडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभार्‍यात 6500 हापूस आंब्याची आरास तयार करण्यात आली होती. सजावटीमधील हापूस आंबे पंढरपूर येथील कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल मधील रुग्णांना तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आले.

पंढरपूर - अक्षय तृतीयेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभार्‍यात मनमोहक हापूस आंब्याची आरास तयार करण्यात आली होती. यात साडेसहा हजार हापूस आंब्यांसह विविध फळांचा समावेश होता. विठ्ठल मंदिर समितीकडून सजावट केलेले आंबे प्रसाद म्हणून कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल तसेच गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले आहेत.

विठ्ठल मंदिर समिती कडून कोविड सेंटर व गरजू नागरिकांना हापूस आंब्यांची वाटप

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक आंब्यांची आरास

वैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास 6500 हापूस आंब्यांसह विविध फळांची मनमोहक आरास करण्यात आली होती. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पपई, डाळिंब, सफरचंद, मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, अननस यांसारख्या साडेसहा हजार फळांचा वापर करण्यात आला होता. यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला होता. ही अमराई आरास पुणे येथील विठ्ठल भक्त विनायक शेठ काची यांनी केली होती.

कोविड सेंटर मध्ये प्रसाद स्वरूपात आंब्यांचे वाटप

कोरोनाने सगळीकडे हाहाकार उडाला आहे, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र मंदिर समितीकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आंब्यांची आरास करण्यात आली होती. सजावटीमधील हापूस आंबे पंढरपूर येथील कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल मधील रुग्णांना तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना प्रसाद स्वरूपात वाटप करण्यात आले. पंढरपूर येथील पालवी संस्था, बेघर निवास, पत्राशेड, घाट परिसर, बस स्टॅन्ड, कामगार वर्ग, झोपडपट्टी येथील लहान मुले व कुष्ठरोगी वसाहत इत्यादी ठिकाणी आंब्याच्या सजावटीचे प्रसाद स्वरूपात वाटण्यात आले.

मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांकडून वाटप

पंढरपूर येथील कोट सेंटर हॉस्पिटल, तसेच विविध संस्था व झोपडपट्टी परिसरामध्ये कोरोना रुग्ण व लहान मुलांना आंब्यांचे तसेच विविध फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः आंब्याचे वाटप केले. यावेळी त्यांनी नियमांचे पूर्णपणे पालन करत आंब्याचे वाटप केले, असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ LIVE Updates : रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 'ऑरेंज अलर्ट' घोषित..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.