ETV Bharat / state

International Women Day 2022 : सोलापूरमध्ये महिलेचा रिक्षा जोरात; पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

author img

By

Published : Mar 8, 2022, 7:32 AM IST

काष्टाला पर्याय नाही. हे काबाड कष्ट असले तरी करावं लागेल अशी समजून स्वत:ची घालत शोभा काम करत आहेत. मात्र, आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकत पारंपरिक रिवाजाला फाटा देत थेट रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्या आज सोलापुरकरांसाठी रिक्षावाल्या दीदी म्हणून प्रसिद्ध आहेत. (Women's Day 2022) त्यांच्या रिक्षात प्रवास करणारा एक प्रवासी गटही तयार झाला आहे. या सर्व प्रवासाबाबत ईटीव्ही भारतने शोभा यांच्याशी खास बातचीत केली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त खास स्टोरी
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त खास स्टोरी

सोलापूर - हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलाला मोठ्या अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी आईने रिक्षाचा स्टेअरिंग हातात घेतला. मोठ्या जबाबदारीने आणि हिमतीने सोलापूर शहरात प्रवाशांना सुरक्षितरित्या पोहचवण्याचे कार्य शोभा घंटे या करत आहेत. आपली परिस्थिती हालाखीची आहे. (History of Women's Day) आपण त्यामधून मार्ग काढून आज हाताला पडेल ते काम करतो आहोत अस त्या सांगतात. (2018)पासून सोलापूर शहरात शोभा घंटे रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करतात. आज महिला दिनानिमीत्त त्यांच्याशी ईटीव्ही भारतची खास बातचीत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त रिक्षा चालक शोभा घंटे यांच्याशी बातचीत

आपल्या कामाशी त्या एकनिष्ठ आहेत

अनेक महिला आजही रिक्षावाल्या दीदीची वाट पाहून त्यांच्याच रिक्षात प्रवास करतात. कितीही उशीर झाला तरी त्यांच्याच रिक्षात जातात. पुरुष-महिला असला कसलाही भेद मनात न ठेवता आपल्या कामाशी त्या एकनिष्ठ आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहे. यामध्ये ते काम करण्यास उत्साह जास्त असेल तर कठीण कामही सोपे होते. (Women's Day significance) असेच कार्य सोलापुरातील शोभा घंटे यांनी करून दाखवले आहे.

सोलापूरमधील रिक्षा चालक शोभा घंटे
सोलापूरमधील रिक्षा चालक शोभा घंटे

पतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला

बेताची परिस्थिती असली तरी खचून न जाता संकटाचा सामना शोभा यांनी संघर्ष कायम केला. शोभा यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. मात्र, घर चालावायचे, मुलांचे शिक्षण, या सगळ्या गोंष्टींसाठी पैशाची गरज भागते. (International Women's Day 2022) एकाच्या पगारावर घर काही चालत नाही. या या परिस्थितीला सामोर जाताना शोभा यांनी पतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला. पण आचारी न होता, समाजसेवा करत घर चालवू आणि मुलाला उत्तम शिक्षण देऊ असा निश्चय त्यांनी केला. एका खाजगी संस्थेतर्फे रिक्षाचालविण्याचे मोफत प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर बँक लोन मार्फत रिक्षा खरेदी केली. आणि थेट रिक्षाची टेअरिंग धरत आपल्या कामाला त्या लागल्या.

सोलापूरमधील रिक्षा चालक शोभा घंटे
सोलापूरमधील रिक्षा चालक शोभा घंटे

खाकी वर्दीची आवड

शोभा यांना खाकी वर्दीची विशेष आवड होती. पोलीस भरतीसाठी अनेकवेळा प्रयत्न केले होते. पण थोडी उंची कमी असल्याने भरती होऊ शकले नाही. अखेर एका खासगी संस्थेमार्फत रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन खाकी वर्दी परिधान केली. पोलिसांच्या नोकरीमधून समाजसेवा करता आली नाही, म्हणून रिक्षा चालक बनून त्या आज खाकी युनिफॉर्मचा आनंद घेता-घेता समाजसेवेचेही काम करत आहेत.

सोलापूरमधील रिक्षा चालक शोभा घंटे
सोलापूरमधील रिक्षा चालक शोभा घंटे

अनेक महिला त्यांच्याच रिक्षात प्रवास करतात

शहरातील महिलांसाठी सुरक्षित रिक्षा सेवा-महिलांची छेड काढणे, किंवा महिला रिक्षात बसल्याकी, आरशातून त्यांना पाहणे, असे अनेक प्रकारच्या घटना पुरुष रिक्षा चालकांकडून घडल्या आहेत. पण एक महिला रिक्षा चालक आहे, ही बाब अनेक महिलांना माहिती झाल्यावर त्यांचा संपर्क क्रमांक घेऊन महिला रिक्षा चालक (शोभा घंटे)यांना बोलवतात आणि त्यांच्याच रिक्षा मधून प्रवास करताना दिसतात.

हेही वाचा - युक्रेनमधील परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांची माहिती संकलनास आरोग्य विद्यापीठाकडून सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.