ETV Bharat / state

करमाळा : कन्याकुमारी एक्सप्रेसला रेल्वेरुळावर दगड ठेवून अडवण्याचा प्रयत्न

author img

By

Published : Oct 18, 2019, 10:01 AM IST

Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

मुंबईकडे जाणारी कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमार्गावर मोठे दगड ठेवून गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाशिंबे स्टेशन मास्तरांनी हा प्रकार पोफळज स्थानकाला कळवला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावरील दगड बाजूला केले.

कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस

सोलापूर - मुंबईकडे जाणारी कन्याकुमारी-मुंबई एक्सप्रेस रेल्वेमार्गावर मोठे दगड ठेवून गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोपळज वाशिंबे (ता.करमाळा) दरम्यान दगडांना धडकून रेल्वे पूढे गेली.

रेल्वे दगडांना धडकल्याची बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी वाशिंबे स्टेशन मास्तरांना याची कल्पना दिली. वाशिंबे स्टेशन मास्तरांनी हा प्रकार पोफळज स्थानकाला कळवला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावरील दगड बाजूला केले. यादरम्यान कन्याकुमारी एक्सप्रेस रात्रीच्या अंधारात सुमारे ४५ मिनिटे वाशिंबे स्थानकावर उभी होती.

हेही वाचा - सावरकरांचा दुसरा चेहरा बघता त्यांना भारतरत्न देणे चुकीचे'

रेल्वे मार्ग सुरळीत झाल्यानंतर ही रेल्वे अतिशय कमी वेगाने पुढे मार्गस्थ झाली. कुर्डूवाडी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी केली. अज्ञातांविरुद्ध करमाळा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी देखाल या भागात रेल्वे रुळावर सिमेंटचे स्लीपर ठेवून रेल्वे लुटण्याचा प्रयत्न झालेला आहे. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Intro:Body:
करमाळा - कन्याकुमारी एक्स्प्रेस ला रेल्वेमार्गावर मोठे दगड ठेवून अडविण्याचा प्रयत्न

सोलापूरहून मुंबईकडे जाणारी कन्याकुमारी- मुंबई एक्सप्रेस गाडी ( गाडी नंबर १६३८२ ) पोपळज वाशिंबे (ता.करमाळा) दरम्यान सुपरफास्ट जात असताना केडगाव कॅम्प जवळील ३३०/७/८ किलोमीटर जवळ रेल्वेमार्गावर मोठ मोठे दगड ठेवून गाडी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.परंतू या दगडांना धडकून एक्सप्रेस गाडी पूढे गेली.१०.४५ ते ११.०० च्पI दरम्यान घडला.
एक्सप्रेस गाडी दगडांना धडकून पूढे जाताच ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांनी पूढे वाशिंबे स्टेशन मास्तरला सांगितली.वाशिंबे मास्तरांनी हा प्रकार पोफळज मास्तरांना सांगताच रेल्वे कर्मचाऱ्यानी रेल्वे मार्गावरील दगड बाजूला केले या काळात कन्याकुमारी एक्सप्रेस रात्रीच्या अंधारात सुमारे ४५ मिनिटे वाशिंबे स्थानकावर उभी होती.मार्ग व्यवस्थित झाल्यानंतर मुंबई नांदेड ही सुपरफास्ट गाडी अतिशय कमी वेगाने पुढे मार्गस्थ झाली दरम्यान कुर्डूवाडी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी भेट देऊन अज्ञाता विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला आहे.
यापूर्वी या भागात रेल्वे रुळावर सिमेंटचे स्लीपर ठेवून रेल्वे अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला आहे त्यामुळे प्रवासात मात्र घबराट निर्माण झाली होती गाडी लुटण्याच्या नादात या प्रकारामुळे गाडीला मोठा अपघात झाला असता तर ? याविषयी प्रवाशात चर्चा होत होती.Conclusion:
Last Updated :Oct 18, 2019, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.