ETV Bharat / state

Vinayak Raut on Election : महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागणार; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचं भाकीत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 7:51 AM IST

Vinayak Raut on Election : देशात लोकसभा निवडणुका वेळेवर होतील, मात्र महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागण्याची दाट शक्यता असल्याचं भाकीत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांनी केलं आहे. तसंच राम मंदिराचा जर्णोद्धार झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकांसमोर जाण्याचं धारिष्ट भाजप सरकार करणार नाही, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

Vinayak Raut on Election
खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग Vinayak Raut on Election : आगामी काळात अयोध्येतील राम मंदिरावरुन राजकारण रंगू लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमधील काही नेते राम मंदिर कधी पूर्ण होतंय याची वाट पाहत असून, जोपर्यंत आयोध्येतील राम मंदिर पूर्ण होत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुका होणार नाहीत, तसंच महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलंय.

विनायक राऊत, खासदार, ठाकरे गट

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागणार : सध्या महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणुका लागण्याची दाट शक्यता असून लोकसभेच्या निवडणुका मात्र वेळच्यावेळी होतील असं खासदार विनायक राऊत म्हणाले. तसंच राम मंदिराचा जर्णोद्धार झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुकांसमोर जाण्याचं धारिष्ट भाजप सरकार करणार नाही. मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रशासन कारभार चालवतय, इथं लोकप्रतिनिधीना स्थान नाही, अशा शब्दात विनायक राऊतांनी राज्य सरकारवर टीका केली. मात्र, महाराष्ट्रासहित अनेक राज्यातील विधानसभा निवडणुका वन नेशन वन इलेक्शन याच सुत्राखाली येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही विनायक राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणुका कधीही झाल्या तरी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केलाय. आम्ही निवडणुकीला नेहमीच सज्ज असतो. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी 24 तास जनसेवेचं व्रत शिकवलंय. तीच जनसेवा अखंड सुरू आहे. यामुळे निवडणुका कधी लागू द्या, आम्ही सामोरं जायला तयार आहोत. समोरची उमेदवार कोण असेल, त्याची चाचपणी सर्व पक्षांकडून सुरू आहे. त्यामुळं त्यांना एखादा पडेल उमेदवार मिळेल, अशी आशा धरायला काहीच हरकत नसल्याचं खासदार विनायक राऊतांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Vinayak Raut On Veer Savarkar : 'हिंमत असेल तर वीर सावरकरांना भारतरत्न मिळवून द्यावा'
  2. Nitesh Rane Attack On Vinayak Raut खासदार विनायक राऊत हे आमचे ऑफिस बॉय कधी झाले, आमदार नितेश राणेंचा खोचक सवाल
  3. Vinayak Raut On Shinde Group : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात - विनायक राऊत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.